शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: स्वस्त औषधाच्या बहाण्याने महिलेची दीड कोटींची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल; मिरजेतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:54 IST

संशयितांचे नाव बोगस असण्याची शक्यता

मिरज : स्वस्त दरात औषध देण्याच्या बहाण्याने मिरजेतील औषध दुकानदार महिलेची सुमारे दीड कोटीची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन भामट्यांविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयश्री सचिन उंडाळे (वय ४८, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजयश्री उंडाळे यांचे मिरजेत ब्राह्मणपुरीत ‘श्री’ स्वस्त औषधी दुकान आहे. सहा महिन्यापूर्वी उंडाळे यांना हर्ष तोलाणी व अरुण कुमार असे नाव सांगणाऱ्या दोघांनी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकवरून संपर्क साधला. उंडाळे यांना ऑनलाइन लिंक पाठवून आभासी ॲपमध्ये नोंदणी करण्यास सांगितले. या ॲपवरून स्वस्त औषधे खरेदी केल्यास अधिक नफा मिळणार असल्याचे भासवले. उंडाळे यांनी ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे औषध खरेदीसाठी रक्कम पाठवली. १३ मार्च ते ६ जून या चार महिन्यात हर्ष तोलाणी व अरुण कुमार यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर उंडाळे यांनी रक्कम पाठवली. त्यानंतर आणखी पैसे दिले नाहीत तर सर्व पैसे बुडतील, अशी भीती घालून उंडाळे यांच्या बँक खात्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाइन पध्दतीने पैसे पाठविण्यास त्यांना भाग पाडले. उंडाळे यांच्याकडून तब्बल एकूण १ कोटी ४३ लाख एकतीस हजार इतकी रक्कम घेतली. त्यानंतर हर्ष तोलानी व अरुण कुमार यांनी औषधे न देता फसवणूक केल्याची तक्रार उंडाळे यांनी शहर पोलिसात दिली आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध बीएनएस ३१८ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयितांचा पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून शोध सुरू केला आहे.संशयितांचे नाव बोगस असण्याची शक्यताहर्ष तोलाणी व अरूण कुमार या दोन वेगवेगळ्या नावाने विजयश्री उंडाळे यांच्याशी संपर्क साधणाऱ्या भामट्यांनी फसवणुकीनंतर मोबाईल क्रमांक बंद ठेवला आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनी बोगस नावांनी संपर्क साधल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.

सर्वात मोठी फसवणूकसायबर भामट्यांकडून फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. वारंवार घटना घडूनही काहीजण जाळ्यात फसत आहेत. मिरजेतील उंडाळे यांची तब्बल १ कोटी ४३ लाखांची फसवणूक झाली आहे. आजपर्यंतची सायबर भामट्यांनी केलेली ही जिल्ह्यातील मोठी फसवणूक असण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Woman Duped of ₹1.5 Crore in Fake Medicine Scam

Web Summary : A Miraj woman lost ₹1.5 crore to fraudsters promising cheap medicine. Two suspects are booked for online fraud; police investigation underway. This is potentially the district's largest cyber fraud case.