संजयनगरच्या विकासासाठी निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:48 IST2021-03-04T04:48:17+5:302021-03-04T04:48:17+5:30

संजयनगर येथे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार हर्षद खाडे, प्रतापराव चव्हाण, डॉ. सुहास पाटील यांच्याहस्ते केला. यावेळी गोरख ...

Will provide funds for the development of Sanjaynagar | संजयनगरच्या विकासासाठी निधी देणार

संजयनगरच्या विकासासाठी निधी देणार

संजयनगर येथे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार हर्षद खाडे, प्रतापराव चव्हाण, डॉ. सुहास पाटील यांच्याहस्ते केला. यावेळी गोरख अर्जुन, संतोष खंडागळे, स्वप्नील सर्जे, सुरेश यमगर, विनायक सरगर आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर हा भाग विस्ताराने मोठा आहे. या भागातील समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिले.

संजयनगर परिसरातील नागरिकांतर्फे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार केला, यावेळी महापौर सूर्यवंशी बोलत होते. यावेळी कृष्णा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण, डॉ. सुहास पाटील, जिल्हा छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष हर्षद खाडे, सलून असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खंडागळे, सोनार असोसिएशनचे गोरख अर्जुन, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत पोळ, स्वप्नील सर्जे, संतोष खैरमोडे, सुरेश यमगर, विनायक सरगर, सुरेंद्र दुपटे आदी उपस्थित होते.

Web Title: Will provide funds for the development of Sanjaynagar