म्हैसाळ योजना दोन दिवसांत सुरू हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST2021-07-24T04:17:28+5:302021-07-24T04:17:28+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क म्हैसाळ : कोयना व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सध्या पूरस्थिती निर्माण झाली ...

Will Mahisal Yojana start in two days? | म्हैसाळ योजना दोन दिवसांत सुरू हाेणार?

म्हैसाळ योजना दोन दिवसांत सुरू हाेणार?

लाेकमत न्यूज नेटवर्क

म्हैसाळ : कोयना व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ योजनेचे पाणी उचलून दुष्काळी भागात सोडण्यासाठी चर्चा सुरू आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना ही दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून ओळखली जाते. उन्हाळ्यात या योजनेतून पाणी उपसा करून दुष्काळी भागाला पाणीपुरवठा केला जातो. कार्यक्षेत्रातील तलाव भरून घेतले जातात. गेल्या वर्षीही पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हैसाळ योजनेतून १.७५ टीमसी पाणी उचलण्यात आले होते. याचा फायदा महापूर कमी करण्यासाठी झाला होता. यावर्षीही या विभागाने मार्च महिन्यातच पाणी योजनेचे आवर्तन सुरू केले होते. सध्याची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी उचलण्याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी दिली. दोन दिवसांत शासनस्तरावर आदेश आल्यास म्हैसाळ योजना सुरू होण्याची शक्यता आहे.

कोट

सद्य:स्थितीमध्ये म्हैसाळ येथे ५३६ मीटर पाणी पातळी आहे. म्हैसाळ योजनेची पाहणी केली आहे. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यास तात्काळ योजना सुरू करू. यासाठी सर्व यंत्रणा तयार आहे.

- सूर्यकांत नलवडे

कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग सांगली

Web Title: Will Mahisal Yojana start in two days?