मॉडेल स्कूलसाठी निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:31 IST2021-09-07T04:31:37+5:302021-09-07T04:31:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : मॉडेल स्कूलसाठी निधी कमी पडू देणार नाही. समृद्ध शाळा विकासात लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे ...

Will fund the model school | मॉडेल स्कूलसाठी निधी देणार

मॉडेल स्कूलसाठी निधी देणार

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : मॉडेल स्कूलसाठी निधी कमी पडू देणार नाही. समृद्ध शाळा विकासात लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी केले.

बिऊर (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत व मॉडेल स्कूल भेटीवेळी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच सुखदेव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, नंदकुमार कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरपंच सुखदेव पाटील यांनी उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण आणि सुसज्ज शाळा मिळणे हा बालकाचा हक्क आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा मॉडेल स्कूलच्या धर्तीवर विकसित कराव्यात, अशी मागणी केली.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, केंद्रप्रमुख धोंडीराम गोसावी, ग्रामसेविका शुभांगी मस्के, उपसरपंच राजेंद्र पाटील, विक्रम पाटील, डॉ. वर्षा पाटील, मुख्याध्यापक विलास गायकवाड, भारती पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Will fund the model school