शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

Sangli Crime: चारित्र्याच्या संशयातून विट्यात पत्नीचा खून, मुले झाली पोरकी; पतीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:20 IST

‘तू सारे काही खरे सांग, नाही तर जिवंतच ठेवत नाही’

विटा : चारित्र्याच्या संशयावरून एकाने पत्नीच्या डोक्यात लोखंडी खोरे घालून खून केला. भाग्यश्री सिद्धाप्पा शिवगोंड (वय २५) असे मयत महिलेचे नाव आहे. विटा पोलिसांनी पती सिद्धाप्पा भिमाप्पा शिवगोंड (वय ३०, रा. शेगुणशी, ता. बबलेश्वर, जि. विजयपूर, सध्या रा. जुना वासुंबे रस्ता, विटा) याला अटक केली.खुनाची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वासुंबे रस्त्यावरील तलावाजवळ घडली. यासंदर्भात सिद्धाप्पाचा शेजारी सुदीप बसवराज बन्नटे (रा. बसवन्न, ता. बागेवाडी, जि. विजयपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली. शिवगोंड पती-पत्नी सुमारे सहा वर्षांपूर्वी विटा येथे रोजगारासाठी आले  होते. जुना वासुंबे रस्त्यावर तलावाकाठी झोपडीवजा घरात अन्य मजुरांसोबत वस्तीवर राहायचे. त्यांना तीन मुले आहेत. पती-पत्नी मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करत होते.काही महिन्यांपासून सिद्धाप्पा भाग्यश्रीच्या चारित्र्याविषयी शंका घेऊ लागला होता. तिचे अन्य कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत होता.  यातून त्यांच्यात सतत वादही होत असत. वस्तीवरील शेजाऱ्यांनी यापूर्वी काहीवेळा वाद मिटवला होता. गुरुवारी दुपारी दोघेही घरातच होते. तेथे त्यांच्यात पुन्हा जोराचा वाद झाला.

‘तू सारे काही खरे सांग, नाही तर जिवंतच ठेवत नाही’, असे सिद्धाप्पाने धमकावले. शिवीगाळ करत लोखंडी खोऱ्याच्या तुंब्याने भाग्यश्रीच्या डोक्यात वार केले. पाच ते सहा जोरदार वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तेथे उपस्थित सुदीप यांनी भाग्यश्रीला उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण उपचार होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

सुदीपने वर्दी दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातून सिद्धाप्पाला ताब्यात घेतले. रात्री अटक केली. ग्रामीण रुग्णालयातच भाग्यश्रीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. उपनिरीक्षक जालिंदर जाधव पुढील तपास करीत आहेत.मुले पोरकीसिद्धाप्पा आणि भाग्यश्री यांना तीन मुले आहेत. आईचा मृत्यू आणि वडील पोलिसांच्या ताब्यात यामुळे तिन्ही मुले उघड्यावर पडली आहेत. वस्तीवरील शेजाऱ्यांनी मुलांना धीर दिला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस