शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सीमावासीयांचा टाहो: सांगलीतील जतमधील लोकांची कर्नाटकात जाण्याची मानसिकता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:42 IST

तालुका विभाजनाच्या प्रश्नाचे तीस वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे.

गजानन पाटीलदरीबडची : जत तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याच्या प्रश्नांबरोबर विभाजनाचा प्रश्न, बेरोजगार, शिक्षण, रस्ता, आरोग्य, शासकीय विभागातील रिक्त जागांचा प्रश्न गंभीर आहे. अनेक वर्षांपासून रिक्त जागाच भरला जात नाही. विकास कामे होत नाहीत. अनुशेष भरून जात नसल्याने सीमावासीय लोकांमध्ये सरकार बद्दल असंतोष निर्माण झाला आहे.जिल्ह्यात जत तालुका विस्ताराने सर्वात मोठा. तालुक्यात १२३ गावे व २७६ वाड्या-वस्त्या आहेत. दोन लाख २४ हजार ५३८ चौरस किलोमीटर आहे. हिंगोली जिल्ह्याइतके या तालुक्याचे क्षेत्रफळ आहे. पंचायत समिती, आरोग विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पोलीस ठाणे यामधील अनेक पदे रिक्त आहेत. बेरोजगारी, उच्च शिक्षण, औद्योगिकीकरण, दळणवळण यापासून मागे आहोत.तालुका विभाजनाच्या प्रश्नाचे तीस वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळे विकासकामे रखडली आहेत. तालुका सर्वात मोठा असल्याने येणारा निधी कमी आहे. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. ३८२ किलोमीटर लांबीचे प्रमुख १३ जिल्हा मार्ग आहेत. इतर जिल्हा मार्गाची लांबी ५६८ किलोमीटर आहे. मात्र रस्त्याची अवस्था बिकट आहे.    तालुक्यात कृषी, इंजिनिअरिंग, वैद्यकीय कॉलेज नाहीत. मराठी, कन्नड व ऊर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. २७८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन ग्रामीण रुग्णालय, ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. पशुवैद्यकीय विभागाचीही पदे रिक्त आहेत.

मराठी शाळांचे काय झाले ?तालुक्यातील सीमावर्ती भागात राज्य शासनाने २०१२ मध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गेल्या दहा वर्षांपासून शाळेचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.कर्नाटकात जाण्याचे मानसिकता काय आहे ?

  • शेतीपंपासाठी मोफत वीज.
  • ६० वर्षावरील व्यक्तीला प्रतिमहिना पेन्शन.
  • शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांची
  • पेरणी करण्यासाठी सवलतीच्या दरात बी बियाणे व रासायनिक खते उपलब्ध.
  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळते.
  • ५ रुपये किलो दराने दुकानात ३० किलो तांदूळ
  • सीमा लगत भागातील विद्यार्थ्यांना गडीनाडू प्रमाणपत्र आधारे नोकरी इंजिनिअरिंग वैद्यकीय प्रवेश दिला जातो.
  • तीन लाखापर्यंत बिगर व्याज कर्ज. 

सीमा भागातील प्रश्नांवर कोणतेही सरकारने गांभीर्याने घेतले नाही. कर्नाटकात जनतेला सेवा सुविधा, मिळत असल्याने कर्नाटकाचे आकर्षण आहे. कर्नाटकात जाण्याची इच्छा नाही. शासनाने सीमा भागातील तालुक्यांसाठी खास बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेऊन मूलभूत सेवा, बेरोजगार, उद्योग, शेतकऱ्यांसाठी  प्रोत्साहन अनुदान द्यावे. शाश्वत विकासासाठी तातडीने कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. - विक्रम ढोणे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र