शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांवर निवडणुका आल्या असताना राजीनाम्याची भाषा का?; अनिल बाबर यांचा संजय पाटीलांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:00 IST

विटा : कृष्णा-कोयनेचे पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. पण, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जरा भान ठेवा, नाहीतर आम्हालाही याबाबत गांभीर्याने घ्यावे लागेल, ...

विटा : कृष्णा-कोयनेचे पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. पण, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जरा भान ठेवा, नाहीतर आम्हालाही याबाबत गांभीर्याने घ्यावे लागेल, असा इशारा देऊन पाण्याचा सर्व प्रश्न सुटला असताना आणि निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्या असताना आपल्याकडून राजीनाम्याची भाषा का ? असा सवाल करीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.शनिवारी खासदार संजय पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याने कोयनेचे पाणी सोडले जात नाही. आमदार बाबर मुख्यमंत्र्यांना फोन करतात आणि मग पाणी सुटते, हा काय प्रकार आहे ? असे प्रश्न उपस्थित करीत पाण्यासाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर रविवारी अनिल बाबर यांनी विट्यात पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्यावर निशाणा साधला.बाबर म्हणाले, एकत्र सत्तेत असताना मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत बोलताना भान ठेवा. जपून बोला. अन्यथा आम्हाला गंभीर दखल घ्यावी लागेल. पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल, पाण्याचे कारण कशाला ? राजीनामा देण्याचे कारण काही वेगळे असेल तर आवश्य राजीनामा द्या. पण, अवघ्या दोन महिन्यांवर निवडणुका झाल्या असताना आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असताना राजीनामा देण्याची भाषा न समजण्याइतपत जनता दूधखुळी नाही. आम्ही कोणत्याही परिणामांची पर्वा न करता तुम्हाला सत्तेत येण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे सरकार चालविण्याची जबाबदारी सर्वांची आहे.गेल्या १० ते १२ दिवसांपासून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्यानंतर कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत होते. जनतेसाठी महत्त्वाचा प्रश्न असल्याने सर्वांचेच प्रयत्न सुरू होते. या दरम्यान, खासदार संजय पाटील यांचा मला फोन आला होता. तुम्ही मुख्यमंत्री शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री देसाई यांच्याशी बोला. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो, असे ते म्हणाले.यानंतर आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करून मुख्यमंत्री शिंदे आणि देसाई यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावला. यानंतर पाणी सोडण्यात आले. आता सगळं झाल्यावर संजय पाटील टीका करीत आहेत. पाण्याचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांची बोलण्याची पद्धत तशी आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण, मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांवर बोलताना भान ठेवले पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना