शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणाऱ्यांच्या पदरात मतदानाचा दुष्काळ का?, ‘स्वाभिमानी’चा सवाल 

By अविनाश कोळी | Updated: June 11, 2024 17:45 IST

निवडणुकीतील शेतकऱ्यांच्या भूमिकेने चळवळीतील कार्यकर्ते अस्वस्थ

सांगली : ऊस दरापासून बेदाण्याच्या प्रश्नापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येवर साखर सम्राट, सरकारी यंत्रणांशी संघर्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदरात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा दुष्काळ वाट्याला आला. ज्यांच्यासाठी लढलो त्या शेतकऱ्यांची मते गेली कुठे? अन्याय करणाऱ्या साखर सम्राटांनाच मतांचे भरभरून दान का मिळाले? संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता निवडणूक लढवायची की नाही? असे मनाला अस्वस्थ करणारे सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी व सामान्य जनतेसमोर उपस्थित करून भावनांना वाट करून दिली आहे.संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी शेतकऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही काय गुन्हा केला म्हणून शेतकऱ्यांनी या लोकसभा निवडणुकीत आम्हाला शिक्षा दिली. मला सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत फक्त साडेपाच हजार मते पडली. एखाद्या पंचायत समितीच्या उमेदवारालाही यापेक्षा जास्त मते मिळतात.निवडणुकीत साखर सम्राट निवडून आले आणि पराभूत झालेलेही साखर सम्राटच आहेत. मते मिळविण्यासाठी एकतर साखर सम्राट हवे किंवा वारसदार हवे, असा या निकालाचा अर्थ घायचा का? तुम्ही आमचे प्रश्न सोडवा पण मत मागायला येऊ नका, आम्ही तुम्हाला मत देणार नाही, आमचे मत आम्ही वाया घालवत नाही, असाच संदेश या निवडणुकीचा असावा, अशी आमची भावना झाली आहे.

राजू शेट्टींनाही का नाकारले?हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांनाही मतदारांनी नाकारले. केवळ पावणे दोन लाख मते त्यांना पडली आहेत. जो उमेदवार पाच वर्षांत मतदारसंघात फिरकला नाही व ज्यांच्याविरोधात ‘खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा’ असे फलक लोकांनी लावले तेच निवडून आले. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्यांना का नाकारले गेले, याचे उत्तर सापडत नाही.

संघटनेचे शेतकरी मतदारांना सवाल

  • ऊस दरासाठी गव्हाणीत उड्या मारल्या, हा गुन्हा केला का?
  • बुडालेली ७० कोटींची ऊस बिले काढण्यासाठी संघर्ष केला. हा गुन्हा होता का?
  • हजार रुपयांचा साखरेचा भाव तीन हजारांवर नेला, हा गुन्हा म्हणायचा का?
  • बेदाण्याचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी प्रयत्न केला, हाच गुन्हा का?
  • कडकनाथ घोटाळाप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्या, हा गुन्हा केला काय?
टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी