शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
3
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
6
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
7
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
9
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
10
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
11
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
12
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
14
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
15
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
16
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
17
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
18
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
19
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
20
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
Daily Top 2Weekly Top 5

मिरज रेल्वे जंक्शनबाबत दुजाभाव का?, रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत खासदार विशाल पाटील आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:12 IST

पुण्यात रेल्वेची बैठक, गैरसोयींच्या प्रश्नावर विचारला जाब

सांगली : मिरजरेल्वे जंक्शन पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात रेल्वेने नेहमी आखडता हात घेतला आहे. त्याचा तातडीने विचार करावा आणि जंक्शन विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी पुण्यात आयोजित खासदारांसोबत झालेल्या रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत केली.रेल्वेचे विविध प्रश्न समजून घेणे आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी कृती आराखडा बनवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते, डॉ. शिवाजी काळगे, रजनी पाटील, नितीन पाटील, मेधा कुलकर्णी, भाऊसाहेब वाघचौरे, नीलेश लंके, डॉ. अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी निगडित विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली. विशेषतः मिरज जंक्शनबाबत त्यांनी ‘टू द पॉईंट’ चर्चा केली. विशाल पाटील म्हणाले, मिरज रेल्वे जंक्शनवर फलाट क्रमांक १ वगळता २, ३, ४, ५, ६ याठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड अपुऱ्या आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. सरकता जिना नाही. प्रवाशांना ओझ्यासह बॅग घेऊन जाणे अडचणीचे होते. फक्त १, ३, ४ क्रमांकाच्या फलाटावर लिफ्ट आहेत. अन्यत्र त्या बसवायला हव्यात.पॅसेंजर गाड्या फलाट क्रमांक ५, ४ व २ याठिकाणी उभ्या केल्याने दिव्यांग व ज्येष्ठ प्रवाशांचे हाल होतात. पार्किंगचा प्रश्न कित्येक वर्षांपासून तसाच आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. फर्स्ट क्लाससाठी वेटिंग रूमचा अभाव आहे. स्वच्छतेचा बोजवारा असतो. पिटलाईनचे काम अद्याप पूर्ण नाही. जंक्शनमधील मॉलचे काय झाले कळत नाही. विशेष गाड्या सोडण्याबाबत नेहमी उदासिनता दाखवली जाते. चाईल्ड हेल्पलाईनला अपुरी जागा आहे. या परिस्थितीत बदल होणार आहे की नाही? मिरज मॉडेल स्थानकाचे काम लवकर सुरू करावे.सांगली-परळी एक्स्प्रेस डेमूऐवजी आयसीएफ डब्याची सोडावी. भिलवडी स्थानकावरील एफओबी ताबडतोब बांधण्यात यावा. ताकारी रेल्वे स्थानकाला महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि कोयना एक्स्प्रेसचा थांबा द्यावा. मिरजमधून बेळगाव, लोंडा, कॅसलरॉक, हुबळीसाठी पॅसेंजर धावतात. त्या धर्तीवर पंढरपूर, कुर्डूवाडी, सातार पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात.

प्रमुख मुद्दे

  • जत-विटा-कऱ्हाड रेल्वे लाईनसाठी सर्वेक्षण वेगाने करून निर्णय घ्यावा.
  • मिरज ते कोल्हापूर, मिरज ते पंढरपूर, मिरज ते पुणे या रेल्वे लाईनवरील नवीन गाडी, पूल बांधकाम, अंडरपास रोड पावसाळ्यात पाण्याने भरून जातात. त्यावर उपाययोजनांची मागणी.
  • खासदारांच्या पत्रावर रेल्वेत तिकिटांचा काळाबाजार होतो, तो थांबवण्याची सूचना.
  • कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत प्रश्न उपस्थित.
  • किर्लोस्करवाडी, वसगडे येथील पुलाचे काम अपूर्ण का? सांगलीत चिंतामण नगर पुलावर पथदिवे का नाहीत?
  • सांगली रेल्वे स्थानकावर मालधक्क्यावर लागणाऱ्या रेल्वेंना प्लॅटफॉर्म, रॅक लवकर मिळत नाहीत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

रेल्वेच्या सांगलीतील या प्रश्नावर चर्चा

  • सांगली रेल्वे स्टेशनवर टर्मिनल कोचिंग पिटलाईन व रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा निर्माण करणे
  • हुबळी-सांगली-पुणे रेल्वे मार्गावर सुरू होणाऱ्या सर्व नवीन गाड्यांना सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देणे
  • सांगली रेल्वे स्थानकावर निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांतीचा थांबा देणे
  • सांगली रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांना सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर, कलबुर्गी जाता यावे यासाठी कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देणे
  • कर्नाटकातून येणाऱ्या बऱ्याच रेल्वे गाड्या उगार व मिरज तालुका दरम्यान पसंतास थांबून असतात. या गाड्यांना पुढे सांगली रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करून विश्रामबाग स्टेशनवर थांबा द्यावा
  • सकाळी सुटणारी कुर्डूवाडी-मिरज-पॅसेंजर गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून सोडावी
  • - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विशेष गाडीस सांगली रेल्वे स्टेशनवरून सोडल्यास भाविकांची सोय होईल
  • हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला किर्लोस्करवाडी व कराड रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा
  • सकाळची कोल्हापूर-मिरज पॅसेंजर गाडी पुढे किर्लोस्करवाडीपर्यंत सोडावी व या गाडीला विश्रामबाग सांगली, माधवनगर, नांद्रे, भिलवडी, अमणापूर येथे थांबा द्यावा
  • सांगली रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूम व पार्सल बुकिंगची सुविधा द्यावी