शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

चीनचा निकृष्ट बेदाणा कर चुकवून येत असताना शासन गप्प का?, जयंत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:16 IST

सरकारची ही उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठली आहे

तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी चीनमधून होणाऱ्या बेकायदेशीर बेदाणा आयातीवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. कर चुकवून आयात होणाऱ्या निकृष्ट बेदाण्यांमुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार या प्रश्नाकडे लक्ष वेधूनही सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने, सरकार या विषयावर गंभीर आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.आमदार पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, यंदाच्या हंगामात हवामानातील बदलांमुळे द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आधीच बेदाणा उत्पादन कमी झाले आहे. अशातच, चीनमधून मोठ्या प्रमाणात कर चुकवून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची आयात होत आहे. या दुहेरी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, परकीय गंगाजळीवरही परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला मिळणाऱ्या अपेक्षित दराचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.पाटील यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, सांगली, नाशिक, जळगाव, सातारा अशा अनेक भागांतील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी पिकवलेल्या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, आणि दुसरीकडे सरकार चीनमधून बेदाणा आयात करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. सरकारची ही उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठली आहे.पाटील यांनी सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत, तात्काळ बेकायदेशीर आयात झालेल्या बेदाण्याची विक्री थांबवावी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे.