शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: टेंभूच्या पाण्याबाबत कवठेमहांकाळवर अन्याय का?, नागरिकांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

By अशोक डोंबाळे | Updated: May 2, 2024 17:34 IST

गावातील पशुधन धोक्यात..

ढालगाव : कवठेमहांकाळ तालुका म्हणजे टेंभू योजनेचा शेवटचा टप्पा आहे. या भागात पाणी सोडून महिना होऊन गेले तरी या तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. कवठेमहांकाळ तालुका वगळता ही योजना सांगोला, आटपाडी, तासगाव आदी लाभ क्षेत्रातील तालुक्यांत जोमाने सुरू आहे. दोन दिवसांत पाणी द्यावे, अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा तालुक्यातील मतदारांनी दिला आहे.मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता तालुक्यातील मतदारांची मोरया कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी अजितराव घोरपडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काय ते विचारतो, असे समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदार थांबण्याच्या मानसिकतेत नाहीत.या योजनेपासून ढालगावसह परिसरातील एकवीस गावे वंचित आहेत. शासकीय निधीबाबतीत ही अशीच परिस्थिती आहे. तासगाव तालुक्याला ७० टक्के निधी तर कवठेमहांकाळ तालुक्याला वितरिका महिनाभरापासून बंद आहे. तासगाव, सांगोला, आटपाडी, टेंभू योजनेच्या सर्व वितरिका सुरू आहेत. पिण्यासाठी पाणी नाही. ढालगाव येथील तलाव पूर्ण कोरडा पडला आहे.कूपनलिकेला पाणी नाही, तर विहिरींनी तळ गाठला आहे. उन्हाचा कडाका व तापमानाची तीव्रता वाढली आहे, असे असताना फक्त कवठेमहांकाळ तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांत टेंभू योजनेचे पाणी सुरू आहे. मग कवठेमहांकाळबाबतच असा निर्णय का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

गावातील पशुधन धोक्यात..दोन दिवसांत पाणी अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मतदारांनी दिला. ढालगावसह परिसरातील एकवीस गावांतील पशुधन धोक्यात आले आहे. तर पाण्याची अवस्था बिकट आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता यांना विचारले असता ते म्हणतात की, आम्हाला वरिष्ठांनी याबाबत काही सांगितले नाही. मग प्रश्न निकालात निघणार कसा, या विवंचनेत मतदार आहेत. यावेळी घोरपडे यांनी नागरिकांना समजाविण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४