शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची भेट का घेतली? राजकीय चर्चा झाली का? भाजपच्या संजयकाकांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 18:56 IST

Sanjaykaka Patil : भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दोन दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांची भेट घेतली,यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या.

Sanjaykaka Patil ( Marathi News ) : राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे, याआदी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.  कोल्हापूरात शरद पवारांनीभाजपाला मोठा धक्का देत समरजीत घाटगेंना पक्षात प्रवेश दिला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आणखी काही नेते निवडणुकीपूर्वी प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता सांगलीतील भाजपा नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांनी खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली, या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या. आता या भेटीत नेमक्या काय चर्चा झाल्या यावर स्वत: संजयकाका पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 

“२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी

"मी काल आधी दिल्लीत गडकरी साहेबांना भेटलो. त्यांनी ४ ऑक्टोंबर ही तारीख दिली. मी आज सकाळी शरद पवार साहेबांना फोन केला. सांगलीत मराठा समाज सांस्कृतिक भवन या नावाखाली गेली ७५ वर्षे काम करतंय. सर्व समाजाच्या हितीसाठी ते प्रमाणिकपणे काम करतात, तिथे पूर्वी एक लहान पुतळा होता. आता त्या पुतळ्याचे मोठे स्वरुप करुन त्यांनी आता इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ फुटी पुतळा तिथे बसवला आहे, त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मी मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार साहेबांची वेळ घेतली, अशी माहिती माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. 

आठ ते दहा मिनिटांची भेट झाली

"शरद पवार साहेब यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. मी आज सकाळीच शरद पवार साहेबांना फोन केला होता तेव्हा साहेब बारामती येथे होते. मला त्यांनी पाच ते सहा वाजण्याच्या वेळेत पुण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी तिथे भेटूया असंही सांगितले, ही भेट आमची आठ ते दहा मिनिटांची झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, याच कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आहे. त्या मंडळाचे काही मंडळीही उपस्थित होते, असंही माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले. 

"आम्ही या कार्यक्रमाला सर्वांना बोलवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी भेटणार आहे. मी राजकीय भेट घेतलेली नाही. मी भारतीय जनता पार्टीमध्ये समाधानी आहे, मी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अनेकांचे फोन आले होते, मी त्यांना सांगितले राजकीय भेट नव्हती. मी या कार्यक्रमासाठी भेटलो असल्याचे त्यांना सांगितले आहे, असंही पाटील म्हणाले. 

टॅग्स :sanjaykaka patilसंजयकाका पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार