शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
3
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
7
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
10
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
11
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
12
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
13
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
14
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
15
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
16
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
17
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
18
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
19
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
20
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

Sangli: समुद्रात पोहताना डोळ्यांसमोरच मुलाचा बुडून मृत्यू, धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:50 IST

मूळचे सांगली जिल्ह्यातील विटा येथील : वसई-विरार महापालिकेचे अधिकारी

विटा (जि.सांगली) : रत्नागिरीच्या समुद्रात शनिवारी पोहताना बुडून मुलाचा डोळ्यांसमोरच मृत्यू झाला. हा धक्का सहन न झालेल्या वडिलांनीही प्राण सोडले. विटा येथील फासे कुटुंबावर हा हृदयद्रावक प्रसंग कोसळला आहे. विनायक सुरेश फासे (वय ४५) असे मृत वडिलांचे नाव आहे. ते विट्याचे सुपुत्र आणि वसई -विरार महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी होते.विनायक फासे हे कुटुंबीयांसह शनिवारी रत्नागिरीला पर्यटनासाठी गेले होते. मुलगा सिद्धार्थ ( वय १९) हा पोहण्यासाठी समुद्रात उतरला. त्यावेळी वडिलांना फोटो काढण्यास सांगितले. त्यांनी मोबाइलवर फोटो घेतला आणि वळून पत्नीकडे जाऊ लागले. त्याचवेळी एक मोठी लाट आली. तिने सिद्धार्थला ओढून खोल समुद्रात नेले.सिद्धार्थ बुडत असल्याचे पाहून फासे दाम्पत्याने आरडाओरड केली. बहिणीनेही आकांत केला. तो ऐकून जीवरक्षक पथकाने धाव घेतली. त्यांनी सिद्धार्थला पाण्यातून बाहेर काढले. छातीवर दाब देऊन त्याचा श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक उपचार केले, पण सिद्धार्थचे प्राण गेले होते. डोळ्यांसमोरच मुलाच्या मृत्यूचा धक्का विनायक यांना सहन झाला नाही. मुलाचे प्राण वाचवू शकलो नाही ही खंत रविवारी दिवसभर लागून राहिली होती. मित्रपरिवार, नातेवाईक सांत्वन करत होते; पण विनायक सावरू शकले नाहीत. सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला.

विनायक फासे कार्यक्षम अधिकारीविनायक फासे हे अत्यंत मितभाषी व कार्यक्षम अधिकारी होते. मुलगा सिद्धार्थही हुशार होता. विनायक फासे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. पिता-पुत्राचे रक्षाविसर्जन एकत्रच करण्याचा दु:खदायी प्रसंग विटेकरांवर आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरीDeathमृत्यू