शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 03:28 IST

पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले; राजारामबापू पाटील जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ

इस्लामपूर (जि. सांगली) : काही लोक सोडून गेले, त्याची चिंता नाही. कामे होत नाहीत, अशा सबबी काहींनी सांगितल्या. मात्र सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे. सत्ता नसली तरी कामाशी बांधिलकी असेल, तर लोकांचा पाठिंबा मिळतोच, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना फटकारले. राजारामबापूंच्या विचाराने पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यार्थी नेते कन्हैया कुमार, माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदींच्या उपस्थितीत झाला. पवार म्हणाले की, राजारामबापूंनी उद्योग आणि वीजमंत्री असताना ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा पाया भक्कम केला. स्थानिकांना रोजगार देण्याचे काम केले. जनता पक्षात गेल्यावर त्यांनी प्रभावी विरोधक म्हणून काम करुन दाखवले. आज देशात आणि राज्यात सत्तेचा गैरवापर होत आहे. जातीपातीवरुन माणसांवरच हल्ले होत आहेत. संकट बाजूला करुन देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, बापूंच्या रक्तात काँगे्रस होती. त्यानंतर ते जनता पक्षात गेले तरी, आम्ही सर्वांनी मिळून समाजवादी विचारधारा भक्कम करण्याचे काम केले. कन्हैया कुमार म्हणाले की, इंग्रजांना पळवून लावताना जितके कष्ट पडले, त्यापेक्षा अधिक प्रयत्न आणि कष्ट भाजपला पळवून लावताना करावे लागणार आहेत. बापूंच्या विचारांचे बोट धरुन बलशाली हिंदुस्थानची उभारणी करावी लागेल. जयंत पाटील म्हणाले, बापूंनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केले. राजकारणात चांगले-वाईट दिवस येतात. मात्र संकटात साथदेतो, तो खरा कार्यकर्ता, ही बापूंची शिकवण आम्ही कायम ठेवली आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवार