शंभर फुटीवरील ६० लाख गेले कुठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:31+5:302020-12-09T04:21:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातही शंभर फुटी रस्त्यावर वर्षभरापूर्वी ६० लाख रुपये ...

Where 6 million on a hundred feet went | शंभर फुटीवरील ६० लाख गेले कुठे

शंभर फुटीवरील ६० लाख गेले कुठे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातही शंभर फुटी रस्त्यावर वर्षभरापूर्वी ६० लाख रुपये खर्च करूनही हा रस्ता पुन्हा खड्ड्यात गेला आहे. हा निधी नेमका कुठे मुरला? असा सवाल नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केला आहे.

साखळकर यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांनी निवेदन देऊन शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नांत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था नागरिकांच्या पाचविला पुजली आहे. काही ठराविक मक्तेदार रस्त्यातील मलिदा खाऊन गलेलठ्ठ झाले आहेत. त्यासाठी २०१७ ते २०२० या तीन वर्षातील हाॅटमिक्स रस्त्यांच्या कामाचे ऑडिट करण्याची गरज आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तातडीने रस्त्यावरील खड्डे मुजवून घेतले पाहिजेत.

शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट असताना, मुख्य शंभर फुटी रस्ताही खड्ड्यात गेला आहे. या रस्त्यावर नुकतेच ६० लाख रुपयांचे डांबरी हाॅटमिक्सचे काम करण्यात आले. आता हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. त्याची अवस्था बघवत नाही. त्या ६० लाखांची चोरीच झालेली आहे. त्यामुळे त्याचीही चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Where 6 million on a hundred feet went