शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पाला मुहूर्त कधी?

By admin | Updated: March 20, 2017 23:42 IST

आराखड्यास मंजुरीची प्रतीक्षा : मुदतीत काम पूर्ण होण्याबाबत शंका; सुधार समिती न्यायालयात जाणार

सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हरित न्यायालयाने डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदत दिली आहे. पण अद्याप या प्रकल्पाच्या आराखड्याला महासभेची मंजुरीच मिळालेली नाही. मार्च महिन्यात सर्वसाधारण सभाच झालेली नाही. आता २४ मार्च रोजी विशेष महासभा आयोजित करण्यात आली असून, या सभेत केवळ पालिका अंदाजपत्रकावरच चर्चा होणार आहे. त्यामुळे आराखडा मंजुरी व त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेत मे महिना संपणार आहे. उर्वरित सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. मार्च महिन्यात महासभाच झाली नाही. आता २४ रोजी पालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत विशेष सभा घेतली आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्याच्या महासभेत प्रकल्प आराखड्यावर चर्चा होऊ शकते. या सभेत आराखड्याला मंजुरी मिळाली तरी, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास जून महिना उजाडणार आहे.(प्रतिनिधी) काय आहे प्रकल्प आराखड्यातसमडोळी व बेडग येथील कचरा डेपोवरील साचलेल्या कचरा नष्ट करणे. दररोजचा सुमारे १८० टन कचऱ्याचे वर्गीकरण करून कंपोस्ट खत, इंधन तयार करणे आदींचा आराखड्यात समावेश आहे. आराखडा तयार झाल्यानंतर महापालिकेने तो हरित न्यायालयात सादर केला. हरित न्यायालयाने आराखड्याला मान्यता दिली. घनकचरा प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करून हमीपत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने हमीपत्र दिल्यानंतर या प्रकल्पात सशर्त मंजुरी दिली आहे. घनकचरा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१७ ही अंतिम डेडलाईन असेल. केवळ आपत्कालीन परिस्थितीत ही मुदत मार्च २०१८ पर्यंत असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.