शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

लाडक्या बहिणीला आणखी लाभ देऊ : जयंत पाटील; इस्लामपूर येथे मुसळधार पावसातही सभेला गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:14 IST

शिवस्वराज्य यात्रेची सांगता  

इस्लामपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर बहिणींना यापेक्षा आणखी चांगला लाभ देऊ. आमच्या माता, भगिनी आणि मुलींच्या केसाला धक्का लागणार नाही, असा कायदा बनवू. सामान्य नागरिकांचे जगणे सुसह्य आणि सुलभ होईल, अशा पद्धतीची धोरणे राबविण्यात येतील. त्यामुळे राज्यातील जनतेने महायुतीला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी महाविकास आघाडीला बळ द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली. यावेळी पाटील बोलते होते. मुसळधार पाऊस पडूनही वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, बजरंग सोनवणे, आमदार सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, ‘युवक’चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, नागेश पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. मुली-महिला असुरक्षित आहेत. सत्तेत असणाऱ्या त्यांच्याच मित्रपक्षाच्या लोकप्रतिनिधीची पोलिस सुरक्षा असताना हत्या झाली. त्यावर सरकार काही बोलत नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. युवकांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. राज्याला कर्जाच्या खाईत लोटून हे सरकार पैशांची वारेमाप उधळपट्टी करत आहे. सरकारच्या या सर्व कारनाम्यांचा पर्दाफाश आम्ही शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून केला.आमच्याकडे शरद पवार यांच्यासारखे खंबीर आणि लढवय्ये नेतृत्व आहे. राज्यातील जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर आजही विश्वास आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता परिवर्तनाची लढाई जनतेच्या बळावर आम्ही जिंकणारच आहोत.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा