शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासारख्याचे भाजपमध्ये काय काम?, जयंत पाटलांनी सवाल करीत चर्चांना दिला पूर्णविराम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:26 IST

जेरीस आणून पक्षप्रवेशाचा खेळ

सांगली : भाजप आता देशात नव्हे तर जगातला सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. त्यांच्याकडे इतकी मोठमोठी लोकं जात आहेत. त्यामुळे तिथे माझ्यासारख्या गरिबाचे काय काम, असा सवाल करीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, पक्षप्रवेशाची चर्चा ही माध्यमांमध्येच आहे. कदाचित भाजपवाल्यांनाही तसे वाटत नसेल. मुख्यमंत्र्यांसमवेत माझ्या भेटी विरोधी पक्षनेता म्हणून होत आहेत. इतर कामांसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का? अशा भेटीवरून कोणीही गैरसमज निर्माण करून घेऊ नये.ते म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, आर. आर. पाटील ही कृष्णाकाठची माणसं विचाराला पक्की होती. त्याच विचाराने सर्वांनी पुढे जाणे गरजेचे होते. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे काहीजण वेगळे निर्णय घेत आहेत. आज कोण कुठल्या पक्षात जाईल, याचा नेम राहिलेला नाही.एखाद्या नेत्यावर आरोप करून त्यांना जेरीस आणायचे आणि नंतर त्यालाच पक्षात प्रवेश द्यायचा, ही महाराष्ट्रात सध्याची राजकारणाची नवी पध्दत सुरू झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केला की, संबंधितांवरील सर्व आरोप निघून जातात. जे लोक त्यांच्यावर टीका करायचे, तेच लोक आता त्यांचा हार घालून सत्कार करताहेत. सर्वांना सत्तेत जायची घाई झालेली आहे. पक्षप्रवेशातून भाजप नेत्यांना राज्याकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नाही.

पूर येऊ नये, यासाठी प्रार्थनाजयंत पाटील यांनी पूर परिस्थिती आणि पाऊस यावर भाष्य केले. यावर्षी पूर येऊ नये, अशी प्रार्थना करतो. पूर येऊ नये, यासाठी सरकारने लक्ष घातले पाहिजे. पाटबंधारे विभागाने योग्यवेळी पाणी सोडले पाहिजे आणि नियोजन केले पाहिजे.

आंदोलनकर्त्यांचे ऐकून घ्याअलमट्टीबाबत जयंत पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे, त्या भागातील लोकांनी जी मतं मांडली आहेत, आंदोलने केली आहेत, सरकारने त्यांचं म्हणणं न ऐकता ज्यांनी आंदोलने केली नाहीत, अशा लोकांना सरकारने बोलावले. आंदोलनकर्त्यांचे प्रश्न सरकारने ऐकून घेतले पाहिजेत.