शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्यासाठी सहा महिन्यात काय काय घडलं? जयंत पाटलांनी सगळा वृत्तांत केला उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 21:42 IST

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. त्यासंदर्भात अजित पवारांच्या बैठकाही झाल्या होत्या. या सगळ्या बैठकांचा वृत्तांत जयंत पाटलांनी उजेडात आणला आहे.

सांगली : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती. त्या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यांत काही बैठकांमधून त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती. शरद पवार यांच्या देखतच दोन्ही पक्ष एक व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

जयंत पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील घडामोडीवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हयातीतच एकत्रीकरणाची त्यांची इच्छा होती. शरद पवार यांनी त्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. त्याच्या तयारीसाठी बारामतीमध्ये नेत्यांची बैठक झाली. त्यासाठी आम्ही विमानातून जाणार होतो. पण, तेथील धावपट्टीवर उतरण्याच्या क्षमतेचे विमान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची बैठक ठरली होती. प्रथम एकत्रीकरण आणि नंतर बाकीचे निर्णय अशी भूमिका अजितदांदाची होती. या चर्चांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता.

अलीकडील काळात अजित पवार अनेकदा माझ्या घरी आले होते. चारवेळा सायंकाळी आले होते. चर्चा आणि जेवण करून जात होते. माझी जनमानसातील प्रतिमा पुसून पुन्हा शरद पवार यांच्यासोबत यायचे आहे,’ असे ते म्हणाले होते. त्यासाठी माझ्या घरी सुमारे आठ ते दहा बैठका झाल्या होत्या. त्यांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी प्रचंड आदर होता. 

आम्ही १२ जानेवारी ही तारीख दिली

‘झालं-गेलं सगळं विसरून, गेल्या दोन-अडीच वर्षांचा कालखंड मागे टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करू,’ ही त्यांची अंतिम भूमिका होती. यातील शेवटची बैठक १६ जानेवारी रोजी झाली. त्यावेळी माझ्या घरी आमचे मुख्य नेतेही उपस्थित होते. तत्पूर्वी खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही बैठक झाली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढण्याचे ठरले होते. सोयीची तारीख ठरविण्याची मोकळीक अजित पवार यांनी मला दिली होती. त्यानुसार आम्ही १२ जानेवारी ही तारीख दिली होती.

दुसऱ्या दिवशी पहाटेच शरद पवार यांना भेटायला जाण्याचे नियोजन केले होते. बारामतीची धावपट्टी लहान असल्याने गाडीने जाण्याचेही नियोजन होते. त्यानुसार आम्ही सकाळी आठ वाजता शरद पवार यांना भेटलो. सविस्तर चर्चेअंती जिल्हा परिषदेच्या निकालानंतरची १२ तारीख निश्चित केली. चर्चा बऱ्यापैकी पुढे गेली होती. 

एकत्रीकरणासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या पक्षातील आमदारांनाही अजित पवार यांनी कल्पना दिली होती. तसे त्यांनी आम्हाला सांगितले होते. ‘मी निर्णय सांगतो, तुम्ही चिंता करू नका, माझे सहकारी मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय घेतील,’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले होते, असेही जयंत पाटील म्हणाले. 

सुनेत्रा पवार यांचा निर्णय पक्षांतर्गत

जयंत पाटील म्हणाले, ‘सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर काही भाष्य करू इच्छित नाही. पटेल, तटकरे आणि काही प्रमाणात भुजबळ यांच्या भूमिकेनुसार निर्णय होत असतील. त्यांच्या पक्षाबद्दल मला काही माहिती नाही. त्याबद्दल बोलणे योग्य आहे असे मला वाटत नाही. नियती किती क्रूर असू शकते हे अजित पवार यांच्या घटनेवरून दिसून येते. विमान हवेत असताना मोठा आवाज येत होता, असे तेथील एका सरपंचांनी मला सांगितले. नेमकी समस्या ब्लॅक बॉक्समधून समोर येईल.’

...तर अजितदादा चांगले मुख्यमंत्री झाले असते

जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, आर.आर. पाटील आणि माझ्यामध्ये कधीही स्पर्धा नव्हती. राजकारणामध्ये मर्यादा कशा सांभाळायच्या याचे उत्तम ज्ञान अजित पवार यांना होते. ते आणि मी कधीही मर्यादा सोडून परस्परांवर बोललो नाही. अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, तर प्रभावी काम केले असते. निर्णयाची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा होता. ते चांगले मुख्यमंत्री बनले असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Secret merger talks: What happened between the two NCPs in six months?

Web Summary : Ajit Pawar wanted NCP merger, discussions held at Jayant Patil's home. He expressed respect for Sharad Pawar. Meetings occurred, aiming for reunification before district council elections. Ajit assured colleagues' support. Setback occurred with Sunetra Pawar's oath.
टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार