पेठ नाका येथे विद्यार्थी संघर्ष यात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:54+5:302021-07-07T04:32:54+5:30
पेठ नाका येथे भाजप विद्यार्थी आघाडीच्या संघर्ष यात्रेचे स्वागत राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी केले. यावेळी जयराज पाटील, जगन्नाथ ...

पेठ नाका येथे विद्यार्थी संघर्ष यात्रेचे स्वागत
पेठ नाका येथे भाजप विद्यार्थी आघाडीच्या संघर्ष यात्रेचे स्वागत राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी केले. यावेळी जयराज पाटील, जगन्नाथ माळी, नीलेश पाटील, प्रतीक साळुंखे, चेतन शिंदे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडीच्यावतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पेठ नाका येथे वाळवा तालुका भाजप विद्यार्थी आघाडीच्यावतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, प्रदेश भाजप कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव जयराज पाटील, जि.प.चे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, डॉ. सचिन पाटील, नगरसेवक चेतन शिंदे यांची उपस्थिती होती. या यात्रेमध्ये जिल्हाध्यक्ष नीलेश पाटील, प्रतीक साळुंखे, योगेश पाटील, पिरू कोळी, अनिल हाके (आटपाडी), पै. हर्षवर्धन पाटील (पलूस), अनिल सूर्यवंशी सहभागी झाले आहेत.
वाळवा तालुका भाजप विद्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रवीण चिकुर्डेकर यांनी स्वागत केले. यावेळी पेठचे माजी उपसरपंच शंकर पाटील, विकास दाभाेळे, पै. बबन शिंदे उपस्थित होते.