दिघंचीतील महिलांना उद्योगासाठी सहकार्य करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST2021-06-19T04:19:11+5:302021-06-19T04:19:11+5:30

विटा अर्बन बँकेच्या दिघंची येथील सभागृहात आयोजित महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वैभव पाटील बोलत होते. ते म्हणाले की, कोणत्याही पदाची ...

We will support the women of Dighanchi for the industry | दिघंचीतील महिलांना उद्योगासाठी सहकार्य करू

दिघंचीतील महिलांना उद्योगासाठी सहकार्य करू

विटा अर्बन बँकेच्या दिघंची येथील सभागृहात आयोजित महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वैभव पाटील बोलत होते. ते म्हणाले की,

कोणत्याही पदाची अभिलाषा न ठेवता मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी आमचे निरपेक्ष प्रयत्न राहणार आहेत.

इस्लामपुरातील महिला उद्योग पाहण्यासाठी महिलांच्या प्रतिनिधी मंडळाला नेण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.

सादिक खाटीक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष अश्विनी कासार, वैशाली सरताळे, पूजा गुरव, निर्मला शेणवे यांनी महिलांसाठी उद्योग व्यवसाय उभारावेत, अशी मागणी केली. शाहरुख पठाण, प्रतापराव देशमुख यांचे भाषण झाले. यावेळी सचिन शिंदे, शोभा माने, वैशाली दाबुगडे, मनोज भोसले, रमेश मोहिते, आबासाहेब नांगरे पाटील, अश्विनकुमार नांगरे पाटील, विनोद बनसोडे, राशिद जमादार, प्रशांत गावडे, दत्ता पुसावळे आदी उपस्थित होते. सागर मोरे यांनी सूत्रसंचालन केले. रुतुराज देशमुख यांनी आभार मानले.

Web Title: We will support the women of Dighanchi for the industry