साहित्य व संस्कृती क्षेत्रात भरीव काम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST2021-06-24T04:18:43+5:302021-06-24T04:18:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळावर काम करण्याची संधी मिळाली आहे. जलसंपदा मंत्री जयंत ...

We will do a lot of work in the field of literature and culture | साहित्य व संस्कृती क्षेत्रात भरीव काम करू

साहित्य व संस्कृती क्षेत्रात भरीव काम करू

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळावर काम करण्याची संधी मिळाली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी व प्रा. प्रदीप पाटील साहित्य व संस्कृती क्षेत्रात भरीव काम करू, असा विश्वास प्रा. शामराव पाटील यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. पाटील यांचा आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने कार्याध्यक्ष कवी प्रा. प्रदीप पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

प्रा. प्रदीप पाटील म्हणाले, तालुक्यातून प्रथमच दोन सदस्य होण्याचा मान वाळवा तालुक्यास मिळाला आहे. आम्ही दोघेही प्रभावी काम करून जयंत पाटील यांचा विश्वास सार्थ करू. यावेळी सतीश पाटील, सुनील चव्हाण, भूषण शहा, प्रा. कृष्णा मंडले, विश्वनाथ पाटसुते उपस्थित होते.

Web Title: We will do a lot of work in the field of literature and culture