सांगली : जगात १८७ देश आहेत. यात आपण कुठे आहोत? संविधानावर पोटात मुरडा झाल्यासारखं विद्वान लोक बोलतात. काय संविधान?. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या लोकांचा हा देश आहे. आम्हाला केवळ स्वातंत्र्य नको तर हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी बुधवारी सांगलीत केले. गणेशोत्सव, नवरात्रमध्ये दांडिया खेळून सणाचे वाटोळे केले, असेही ते म्हणाले.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीमध्ये धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना भिडे बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता दौडीचे आयोजन करतो. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता. गणपती उत्सव, नवरात्रमध्ये दांडिया खेळून वाटोळे केले.
Web Summary : Sambhaji Bhide stated India needs Hindavi Swarajya, not just independence. He criticized celebrating Navratri with Dandiya, claiming it corrupts the festival's sanctity. He spoke at a Durga Mata Daud event in Sangli, emphasizing Shivaji Maharaj as the ideal.
Web Summary : संभाजी भिडे ने कहा, भारत को केवल स्वतंत्रता नहीं, हिंदवी स्वराज्य चाहिए। उन्होंने डांडिया के साथ नवरात्रि मनाने की आलोचना की, इसे त्योहार की पवित्रता को भ्रष्ट करना बताया। सांगली में दुर्गा माता दौड़ कार्यक्रम में बोलते हुए, उन्होंने शिवाजी महाराज को आदर्श बताया।