Wazir to celebrate Labor Award on 7th | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या सांगली जिल्हा दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या सांगली जिल्हा दौऱ्यावर

ठळक मुद्देअवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार

सांगली : अवकाळी पावसाने जिल्'ात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या (शुक्रवारी) जिल्हा दौºयावर येत आहेत. शुक्रवारी सकाळी ते विटा येथे येणार असून खानापूर व कडेगाव तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.

विभुते म्हणाले की, महापुरापाठोपाठ जिल्'ात परतीच्या मान्सूनच्या पावसानेही मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर लगेचच अवकाळी पावसामुळे जिल्'ातील द्राक्ष, डाळिंबासह बागायती क्षेत्र व नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्'ाच्या काही भागात तर ओल्या दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शुक्रवारी जिल्हा दौºयावर येत आहेत.

शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हेलिकॉप्टरने ठाकरे यांचे विटा येथे आगमन होणार आहे. जिल्'ात प्रशासनाकडून सुरू असलेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू असले तरी, अद्यापही अनेकजणांचे पंचनामे झालेले नाहीत. अशा शेतकऱ्यांना मदतीसाठी शिवसेनेच्यावतीने विट्यात मदत केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्रास ठाकरे भेट देणार आहेत. त्यानंतर नेवरी (ता. कडेगाव) येथील विठ्ठलनगर येथील अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहेत.

तेथून विटा येथील रामभाऊ लोटके यांच्या डाळिंबाच्या बागेची व प्रकाश गायकवाड यांच्या द्राक्षबागेच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर ते मायणी (जि. सातारा) गावाकडे रवाना होणार आहेत.

शिवसेनेला सध्या सत्ता स्थापनेची संधी आहे, मात्र सत्तेपेक्षाही शेतकºयांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्यानेच पक्षप्रमुख दौºयावर येत असल्याचे विभुते यांनी सांगितले. यावेळी शंभोराज काटकर, दिगंबर जाधव उपस्थित होते.

 

Web Title:  Wazir to celebrate Labor Award on 7th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.