शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

वरुणराजाची कृपादृष्टी; दोन दिवसांत सांगली जिल्ह्यात ४ टक्के पाणीसाठा वाढला

By अशोक डोंबाळे | Updated: June 11, 2024 18:56 IST

मान्सूनच्या दमदार एन्ट्रीचा खरिपाला फायदा : पेरणीसाठी जमिनीच्या वापसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

सांगली : मागील आठवड्यात वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने जिल्ह्यातील पाझर तलावाच्या पाणीसाठ्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणखी आठवडाभर असाच पाऊस राहिल्यास जिल्ह्यातील पाझर तलावांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनच्या दमदार एन्ट्रीचा खरीप पेरणीला फायदा झाला असून, शेतकरी खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे.जिल्ह्यात मध्यम प्रकल्प पाच आणि लघू प्रकल्प ७८, असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सात हजार ७७५ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची क्षमता आहे. २९ मे २०२४ रोजी ८३ प्रकल्पांमध्ये एक हजार ४४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. या पाण्याची टक्केवारी १३ होती. मागील आठवड्याभरात जिल्ह्यात जोरदार मान्सून पावसाचे आगमन झाले. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यासह सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. यामुळे पाझर तलावांच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ८३ प्रकल्पांमध्ये सध्या एक हजार ४३४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. मध्यम आणि लघू प्रकल्पामध्ये जवळपास ४ टक्के पाणीसाठा वाढून १७ टक्के झाला आहे. आणखी आठवडाभर असाच पाऊस पडत राहिल्यास जवळपास ५० टक्क्यांपर्यंत मध्यम आणि लघू प्रकल्प भरण्याची शक्यता आहे. पावसाची दमदार एन्ट्री झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०६.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

कोरड्यात तलावातही झाला पाणीसाठा२९ मे २०१४ च्या पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २० पाझर तलाव कोरडे आणि २४ तलावांमध्ये मृत पाणीसाठा होता. सध्या १७ तलाव कोरडे असून, १९ तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे. कोरडे पडलेले तीन तलाव भरले असून, मृतसाठा असणाऱ्या पाच तलावांतही पाणी आले आहे.

जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या.. मगच करा पेरणीयावर्षी मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. त्याप्रमाणे यंदाच्या पावसाळ्याचा ट्रेलरदेखील सांगली जिल्ह्यात चांगला पाहावयास मिळाला. मात्र, जमिनीत अजून तितका ओलावा झालेला नाही. जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या आणि मगच पेरणी करा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसWaterपाणीFarmerशेतकरी