शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर-पूर्व कर्नाटकात पाणीटंचाई, कर्नाटकने महाराष्ट्राकडे मागितले ६ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:09 IST

अधिकारी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही!

सांगली : उत्तर-पूर्व कर्नाटकातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे कृष्णा नदीतून तीन आणि भीमा नदीतून तीन टीएमसी पाणी सोडावे, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केली. पाणी देण्याबाबत महाराष्ट्राने अद्याप कोणताही प्रतिसाद कर्नाटकला दिला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, उत्तर-पूर्व कर्नाटकातील बेळगाव, विजयपूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यातील गावांमध्ये तीव्र उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच टंचाई असल्यामुळे पाण्याची नितांत गरज आहे. नागरिकांच्या आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून वारणा (चांदोली) आणि कोयना धरणातून कृष्णा नदीत तीन टीएमसी आणि उजनी जलाशयातून भीमा नदीत तीन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारने यापूर्वीच केली आहे. महाराष्ट्र सरकारने या मागणीचा विचार करून मेच्या पहिल्या पंधरवड्यात एक टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडले आहे. कर्नाटकातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तीव्र उन्हाळा अजूनही कायम आहे. या जिल्ह्यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने, पशुधन आणि घरगुती वापरासाठी पाण्याची गरज आहे. उत्तर कर्नाटकामध्ये अद्याप मान्सून सुरू झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने वारणा आणि कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्याची गरज आहे. सोबत तीन टीएमसी पाणी उजनी जलाशयातून भीमा नदीत सोडावे. पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने सूचना द्याव्यात.

अधिकारी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही!कर्नाटक सरकारने पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत सांगलीच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कर्नाटकसाठी पाणी सोडण्याबाबत आम्हाला कोणतीही सूचना नाही. शिवाय सध्या कोयना आणि वारणा धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. आपल्या दुष्काळी तालुक्यांसाठीच्या पाणी योजना सुरू ठेवण्यासाठी पाणी कमी पडत आहे.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी