शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात काही गावात पाणीटंचाई; आठवड्यातून एकदा मिळतेय पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:57 IST

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही ...

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही काही ठिकाणी पाणीटंचाई आहे. वीजटंचाई, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर ही पाणीटंचाईची कारणे आहेत.फेब्रुवारी महिना असूनही जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सांगली, मिरजेसारख्या शहरांमध्ये अजून तरी पाण्यावरून स्फोटक स्थिती तयार झालेली नाही. काही शहरे आणि गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असली तरी त्यामागचे कारण नैसर्गिक कमी आणि नियोजनाचा अभाव हेच अधिक दिसते. टँकरची गरज ही लोकांपेक्षा सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचीच अधिक असल्याचे जाणवते. सध्या सुमारे पंचवीसभर गावे आणि वाड्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. यात सर्वाधिक टँकर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत लागण्याची शक्यता आहे.

महापालिका क्षेत्रातील काही विस्तारित भागातही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. अग्निशमन दलाचे तसेच पाणीपुरवठा विभागाचे काही टँकर तेथे पाणीपुरवठा करतात.जत, आटपाडीत जानेवारीपासून उन्हाळा!जत आणि आटपाडी तालुक्यात जानेवारीपासूनच पाण्याची दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. विशेषतः जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.

टोलेजंग इमारती, दर १५ फुटांवर बोअरमहापालिका क्षेत्रात टोलेजंग इमारतींच्या जंगलात दर १५ फूट अंतरावर रहिवाशांकडून बोअर खोदण्यात आल्या आहेत. सांगली, मिरजेतील विस्तारित भागातील काही उपनगरात अनेक वर्षांपासून टँकरनेच पाणी पुरविले जाते.टँकर आता सुरू; पुढे काय?जिल्ह्यात काही भागात टँकरने सध्या सुरळीत पाणीपुरवठा सुरू असला तरी ऐन एप्रिल, मे महिन्यात टंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यावेळी जिल्हाभरात टँकरची मागणीही वाढणार आहे.पाणी आले की लाइट गायब होते

  • ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या पाणीयोजनांचे मूळ स्त्रोत आटू लागले आहेत.
  • काही ठिकाणी तब्बल आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
  • मात्र पाणी येताच वीजपुरवठा गायब होत असल्याने पाण्याचा उपसा मुश्कील झाला आहे.

नळ कोरडे; गल्लीत पाट वाहतायकाही गावांत पाणी योजनांना मोठी गळती आहे. तेथे घरोघरी नळ कोरडे आहेत, मात्र मुख्य वाहिनीच्या गळतीमुळे रस्तोरस्ती पाण्याचे धो-धो पाट वाहताना दिसतात.

टँकर अन् जारच्या टेन्शनने बेजार!ही गावे टँकर आणि जारच्या टेन्शनने हैराण आहेत. गावोगावी खासगी फिल्टर प्रकल्प सुरू झाले असून, तेथे पाण्याची विक्री सुरू आहे.

गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाणीयोजनेचा मुख्य स्त्रोत असलेल्या तलावात मुबलक पाणीसाठा आहे, मात्र योजनेला गळती लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिण्याचे पाणी विकत आणतो; मात्र वापराचे पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करायला हवी. - राजेंद्र पाटील, ग्रामस्थ, आरग (ता. मिरज)

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळWaterपाणी