शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पलूस, वाळवा तालुक्यातील क्षारपड जमिनीच्या समस्येवर लवकरच तोडगा, जलसंपदामंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:50 IST

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती मुंबईत बैठक 

पलूस : पलूस व वाळवा तालुक्यातील क्षारपड आणि पाणथळ जमिनीच्या समस्येबाबत मुंबई येथे गुरुवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत बैठक पार पडली. या बैठकीत विखे पाटील यांनी याप्रश्नी सकारात्मक विचार होईल असे सांगून तातडीने विद्यमान निचरा कॅनॉलची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. तसेच नवीन निचरा कॅनॉलसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या समस्येवर तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पलूस, वाळवा आणि मिरज तालुक्यांतील कृष्णा नदीकाठच्या गावांना अनेक वर्षांपासून भेडसावत असलेली क्षारपड आणि पाणथळ जमिनीची समस्या मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. मार्च २०२५ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी ही समस्या लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभा सभागृहात मांडली होती. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात तातडीने बैठक बोलावली.पलूस तालुक्यातील तब्बल २८ गावे क्षारपड आणि पाणथळ जमिनीच्या समस्येला सामोरी जात आहेत. कृष्णा नदीला दरवर्षी येणारे महापूर, अवकाळी पाऊस आणि पाण्याचा दीर्घकालीन साठा यामुळे या भागातील जमिनीची सुपीकता कमी होत आहे. १९९९ ते २००४ दरम्यान या समस्येवर उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात निचरा कॅनॉल (उघड्या चरी)ची कामे करण्यात आली होती.मात्र, कालांतराने अनेक चरी अडथळ्यांनी भरल्या असून त्यांची तातडीने स्वच्छता आणि दुरुस्ती आवश्यक आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत सर्व बाबींचा सकारात्मक विचार होईल असे सांगितले. त्यांनी तातडीने विद्यमान निचरा कॅनॉलची स्वच्छता करण्याचे आदेश दिले तसेच नवीन निचरा कॅनॉलसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच, क्षारपड जमिनीबाबतच्या धोरणाविषयी सरकार सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे, कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता धुमाळ तसेच जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पलूस तालुक्यातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात येत असून लवकरच या प्रश्नावर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे.

बैठकीतील चर्चा आणि मागण्या

  • बैठकीत आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पुढील मागण्या मांडल्या:
  • विद्यमान उघड्या चरांची तातडीने स्वच्छता आणि दुरुस्ती करावी.
  • पलूस तालुक्यातील सर्व गावांचा पुन्हा योग्य पद्धतीने सर्वेक्षण करावे.
  • आवश्यकतेनुसार नवीन निचरा कॅनॉल (उघड्या चरी) उभाराव्यात.
  • क्षारपड जमिनीच्या बाबतीत असलेले सरकारचे ८०–१०–१० धोरण पुनर्विचारात घ्यावे.
  • सामाजिक संस्थांना मिळणारे हेक्टरी अनुदान सध्याच्या ६० हजार रुपयांवरून वाढवून खर्चाच्या ८० टक्केपर्यंत करावे.