शिराळा : वाकुर्डे बुद्रूक योजनेसाठी शुक्रवारपासून चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. शनिवारी खिरवडे व हातेगाव पंप हाऊस सुरू होणार आहेत. दरम्यान वाकुर्डे योजनेच्या पाण्याची योग्य नियोजन करून सर्व मध्यम प्रकल्प व तलाव भरून घ्यावेत, अशा सूचना आमदार सत्यजित देशमुख यांनी केल्या.वाघवाडी (ता. वाळवा) येथे वारणा डावा कालवा कार्यालयात आमदार सत्यजित देशमुख यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर कालव्यात पाणी सोडण्यात आले. वाकुर्डे बुद्रूक योजनेसाठी चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू करण्यात आला. खिरवडे व हातेगाव येथील पंप हाऊस सुरू होऊन पाणी करमजाई धरणात येईल. करमजाई धरण भरून पुढे पाणी रेठरे धरण, कार्वे, ढगेवाडी, शिवपुरी, जक्राईवाडी, सुरूल, ओझर्डे पर्यंत पीडीएन मधून मायनरला पोहचेल. बैठकीत पंधरा दिवसांचे पाण्याचे योग्य नियोजन करा, तोरणा ओढ्यातून पाणी खाली येईल अशा पद्धतीची योग्य नियोजन करा, शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये अशा सूचना आमदार सत्यजित देशमुख यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी वारणा डावा कालवा कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, उपअभियंता सतीश पाटील, उपअभियंता गुरू महाजन आदी उपस्थित होते.
सध्या वीजनिर्मिती केंद्रातून १००० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तसेच वाकुर्डे बुद्रूक योजनेसाठी शुक्रवारी डाव्या कालव्यात २०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये हळूहळू वाढ करून ३०० क्युसेक पर्यंत विसर्ग करण्यात येणार आहे. - बाबासाहेब पाटील, उपविभागीय अभियंता
Web Summary : Water discharge from Chandoli Dam started for Wakurde Budruk project. MLA Satyajit Deshmukh instructed officials for water management. The water will fill various projects and lakes through canals, benefiting farmers and the region's water supply.
Web Summary : वाकुर्डे बुद्रुक परियोजना के लिए चंदोली बांध से पानी छोड़ा गया। विधायक सत्यजित देशमुख ने जल प्रबंधन के लिए अधिकारियों को निर्देश दिया। नहरों के माध्यम से पानी विभिन्न परियोजनाओं और झीलों को भरेगा, जिससे किसानों और क्षेत्र की जल आपूर्ति को लाभ होगा।