शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जल, दुग्धाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST2021-06-25T04:19:16+5:302021-06-25T04:19:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने बुधवारी शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला सात नद्यांचे पाणी ...

Water, milk anointing to the statue of Shivaji Maharaj | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जल, दुग्धाभिषेक

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जल, दुग्धाभिषेक

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने बुधवारी शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला सात नद्यांचे पाणी व दुधाचा अभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसराला फुलांनी सजवून पेढे वाटण्यात आले.

तिथीनुसार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संघटनेतर्फे वसंतदादा साखर कारखाना येथील शिवतीर्थावर साजरा करण्यात आला. यावेळी शिव पुतळ्याला गंगा, सिंधूसहित सात नद्या आणि सात गडांवरचे पाणी व दुधाचा अभिषेक करण्यात आला. प्रेरणामंत्र म्हणून कार्यकर्त्यांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा यावेळी दिल्या.

या सोहळ्याला संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले, विकास सावंत, नितीन पवार, भूषण गुरव, पै. मोहन शिंदे, उमेश खोत, नीलेश चौगुले, प्रतीक पाटील, संग्राम घोरपडे, पृथ्वीराज पाटील, जयदीप सदामते, अभिषेक आंबे, रोहन मोरे, रोहित मोरे, नितीन सोनंदकर, संदीप माळी, अवधूत बेलवलकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Water, milk anointing to the statue of Shivaji Maharaj