शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूचे पाणी व्यवस्थापन आता 'अॅप'वर होणार, डॉ. भारत पाटणकरांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 16:09 IST

पाणी आल्यानंतरही त्याचे व्यवस्थापन, पीक पद्धत, पाण्याचा ताळेबंद, पाणीपट्टी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ॲप तयार केले जाणार

आटपाडी : टेंभूच्या बंद पाइपलाइनच्या मुख्य वितरिकेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी आल्यानंतर त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी पाणी वापर संस्था व शेतकऱ्याच्या मदतीसाठी अॅप तयार केले जाणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सोपेकॉम संस्थेचे के. जे. जॉय यांनी दिली.पाटणकर म्हणाले, समन्यायी पाणी वाटपासाठी बंद पाइपलाइनच्या पथदर्शी प्रकल्पाच्या अभ्यासासाठी शेतकरी, पाणी वापर संस्था यांच्या समन्वयातून पाणी व शेती व्यवस्थापनासाठी ॲप विकसित केले जाणार आहे. यासाठी  जर्मनीच्या टीएमजी रिसर्च ग्रुपकडून लॅरिसा स्टीअम भाटिया आटपाडीत आल्या आहेत. पाणी आल्यानंतरही त्याचे व्यवस्थापन, पीक पद्धत, पाण्याचा ताळेबंद, पाणीपट्टी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ॲप तयार केले जाणार आहे.आनंदराव पाटील म्हणाले, तालुक्यातील शेती व शेतकऱ्यांची सर्व माहिती एकत्रित करून मॉडेल बनवले जाणार आहे. तालुक्यातील २७ हजार कुटुंबाचा, ११ हजार विहिरी, ५ हजार कूपनलिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ३ फेब्रुवारीला पुणे येथे टेंभूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. यापूर्वी मुख्य वितरिकेची कामे सुरू होणे गरजेचे आहे. पाण्यापासून वंचित असलेली गावेही समाविष्ट करण्यात येणार आहेत.यावेळी किरण लोहकरे, नेहा भडभडे, भीमराव यमगर, अमोल माने, अजय महारनूर, दादासाहेब वाक्षे, आनंदराव शेंडे उपस्थित होते.फडणवीसांसोबत लवकरच बैठकसमन्यायी पाणी वाटपाच्या बंद पाइपलाइनचा पथदर्शी प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी