शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कवठेमहांकाळ तालुक्यात आले पाणी, पाणीटंचाई दूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 15:30 IST

सरपंचांची मागणी व लोकमतच्या पाठपुराव्यास यश..

महेश देसाईकवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात अग्रणी नदीला सोडलेल्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यात अग्रणी नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. याबाबत अग्रणी नदीत पाणी सोडण्यासाठी लोकमतने दि. २० एप्रिल रोजी अग्रणी नदीकाठच्या सरपंचांच्या प्रतिक्रिया घेऊन मागणी केली होती. अखेर पाणी सोडल्यामुळे सरपंचांची मागणी व लोकमतच्या पाठपुराव्यास यश आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकमतसह सरपंचांचे आभार मानले आहेत.

कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या म्हैसाळ व टेंभू सिंचन योजनेचे पाणी कालवा तुडुंब भरून वाहत आहे. हा कालवा भरून वाहत असताना कवठेमहांकाळ तालुक्याची जीवनवाहिनी असलेली अग्रणी नदी कोरडी ठणठणीत पडली होती. अग्रणी काठचे सरपंच व लोकमतच्या पाठपुराव्याला यश आले असून हे पाणी काही दिवसांपूर्वी अग्रणी नदीत सोडले असून हे पाणी धुळगावपर्यंत गुरुवारी पोहोचले आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात म्हैसाळ योजना असून तालुक्यातील काही गावांना फायदा होत नव्हता. त्यामुळे या अग्रणी नदीकाठचे तहानलेले शेतकरी अग्रणी नदीत आंदोलन करताना दिसले होते. अग्रणी नदी खोऱ्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, शिरढोण, मोरगाव, विठुरायाची वाडी, हिंगणगाव,अग्रण धुळगाव, लोणारवाडी असे गावे असून ह्या गावांच्या गावकुसातील अग्रणी नदी गेल्या कित्येक दिवसांपासून ठणठणीत असल्याने अग्रणी खोऱ्यातील गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता.

कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने अग्रणी नदीत पाणी सोडले. मोरगाव, हिंगणगाव, कवठेमहांकाळ, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी या गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत ऐन उन्हाळ्यात समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर बंधारे भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी अग्रण धुळगावमध्ये दाखल झाले आहे. आता हे पाणी लोणारवाडी बंधाऱ्यात पोहोचेल. कवठेमहांकाळ परिसरातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने पाटबंधारे खात्याकडे अग्रणी नदीवरील बंधारे भरून मिळावेत अशी मागणी केली होती.मागणीनुसार पाटबंधारे खात्याने सर्व्हे करून नदीकाठावरील गावांना पिण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता बंधारे भरून घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता म्हैसाळ योजनेतून अग्रणी नदीवरील बारा बंधारे तातडीने भरण्याचे काम सुरू आहे. म्हैसाळ बंधाऱ्यात सध्या पाणी आले आहे. आता हे पाणी हिंगणगाव विठुरायाचीवाडी, धुळगाव, रांजणी, लोणारवाडी येथील अग्रणी नदीवरील बंधारे भरून घेतले जातील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी