शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: कवठेमहांकाळ तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी दाखल, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:06 IST

म्हैसाळेचे पाणी तालुक्यात आल्याने शेतकरी पीक पद्धत बदलून फळशेती लागवडीकडे वळला

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या वर्षापासून बंद असलेली म्हैसाळ  उपसा सिंचन योजना सुरू झाली असून म्हैसाळ योजनेचे पाचवा टप्प्यातून पाणी सोडले आहे. गुरुवारी जाधववाडी ते कुचीपर्यंत पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.सध्या खरीप हंगाम जोमाने सुरू असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षेबाग छाटणीला सुरुवात केली आहे. उसाची नव्याने लागण करण्याची लगबग शेतकऱ्यांत सुरू आहे. म्हैसाळेचे पाणी तालुक्यात आल्याने शेतकरी पीक पद्धत बदलून फळशेती लागवडीकडे वळला आहे.म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यात दाखल झाल्यापासून पाटालगतच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु अग्रणी नदीत पाणी सोडल्याशिवाय अग्रणी काठावरील शेतकऱ्यांना पाणीच मिळू शकत नाही. त्यामुळे अग्रणी काठावरील शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी अग्रणी नदीत पाणी सोडणे आवश्यक आहे.  शेतकऱ्यांनीही काळजीने पाणीपट्टी भरावी, असे आवाहन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.अग्रणीत पाणी सोडावे!अग्रणी काठावरील शेतकऱ्यांची द्राक्षे, केळी, ऊस, हळद, मका, कांदा, लसूण, उन्हाळी भुईमूग याचबरोबर डाळींब, चिकु, पेरू, सीताफळे आदी उन्हाळ्यातील पिके जगविण्यासाठी पाण्याची गरज आहे. यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी नदीत पाणी सोडावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी