शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेल्या कूपनलिकेचे पाणी झेपावले आकाशात; निसर्गाच्या चमत्काराची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 20:37 IST

गेल्या दोन - अडीच वर्षापूर्वी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आलेली कूपनलिका ग्रामपंचायतीने पाण्याअभावी सोडून दिली होती. परंतु, याच कूपनलिकेतून अचानक सुमारे १५० ते २०० फूट पाणी आकाशात झेपावले.

विटा: गेल्या दोन - अडीच वर्षापूर्वी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आलेली कूपनलिका ग्रामपंचायतीने पाण्याअभावी सोडून दिली होती. परंतु, याच कूपनलिकेतून अचानक सुमारे १५० ते २०० फूट पाणी आकाशात झेपावले. या प्रकारामुळे ग्रामस्थही अचंबित झाले आहेत. तसेच हा सर्व प्रकार निसर्गाचा चमत्कार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सदर घटना वासुंबे (ता. खानापूर, जि. सांगली) येथे मंगळवारी घडली असून दूसऱ्या दिवशी (बुधवारी) स्थानिक ग्रामस्थांना हा प्रकार दिसून आला.

पाण्याअभावी बंद पडलेल्या कूपनलिकेतून पाण्याचे कारंजे आकाशाकडे झेपावत असल्याचे समजताच हा चमत्कार पाहण्यासाठी वासुंबे गावात लोकांची गर्दी झाली होती. खानापूर तालुक्यातील वासुंबे हे दुष्काळग्रस्त गाव आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे २०१७ ला ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी शासकीय विहिरीशेजारी असलेल्या यल्लमा मंदिराजवळ कूपनलिका खुदाई केली होती. परंतु, ही कूपनलिका खुदाई करीत असताना आडवा पडदा लागल्याने हवा दुसरीकडे जाऊ लागली. त्यामुळे कूपनलिका खुदाई करणाºयाने ३०० ते ३२० फुटापर्यंतच खुदाई केली. पण त्या कूपनलिकेला पाणी लागले नाही.

तसेच कूपनलिका गेल्या दोन ते अडीच वर्षापासून बंद अवस्थेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वासुंबे व परिसरात पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी ओढ्यातून कूपनलिकेत जात होते. मंगळवारी सकाळी अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर कूपनलिकेतून सुमारे दीडशे ते दोनशे फूट पाण्याचा कारंजा आकाशात झेपावताना लोकांच्या निदर्शनास आला. हे वृत्त वाºयासारखे गावात व परिसरात पसरताच ते पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. बंद कूपनलिकेतून मोठ्या प्रमाणात पाणी आकाशात झेपावल्याने हा निसर्गाचा अद्भूत चमत्कार असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू झाली.

नेमके कारण अस्पष्ट...

वासुंबे येथे पाणी लागले नसल्याने सोडून दिलेल्या कूपनलिकेतून अडीच वर्षानंतर पाण्याचे मोठे कारंजे उडू लागले. हा प्रकार दिवसातून दोनवेळा होत असून त्यातील पाणी कारंजासारखे दीडशे फूट आकाशात झेपावत असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली