सुरेंद्र वाळवेकर यांच्या प्रयत्नातून वसगडे येथे वॉटर एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:11+5:302021-06-26T04:19:11+5:30
भिलवडी : भिलवडी येथील जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्या विशेष प्रयत्नातून वसगडे (ता. पलूस) येथील हजारे मळा येथे ...

सुरेंद्र वाळवेकर यांच्या प्रयत्नातून वसगडे येथे वॉटर एटीएम
भिलवडी : भिलवडी येथील जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्या विशेष प्रयत्नातून वसगडे (ता. पलूस) येथील हजारे मळा येथे वॉटर एटीएम प्लॅन्ट सुरू करण्यात आला.
यासाठी चार लाख रुपये निधीची तरतूद जिल्हा परिषदेतून करण्यात आली.
हजारे मळा येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीच सोय नव्हती. राष्ट्रीय पेयजल योजनेचे पाणी मिळत नव्हते. वाळवेकर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चार लाख रुपयांची विशेष तरतूद केली होती. वाळवेकर यांच्या हस्ते वॉटर एटीएम सुविधेचा आरंभ करण्यात आला.
यावेळी वाळवेकर म्हणाले, येथे हजारे मळ्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. वसगडेचे सरपंच श्रेणिक पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे निधीसाठी मागणी केली होती. त्याचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा केला. खासदार संजयकाका पाटील यांच्या फंडातून मळ्याकडे जाण्यासाठी रस्त्याची सोय करणार आहे.
यावेळी उपसरपंच संपतराव पवार, जवाहर पाटील, नारायण खटावकर, सचिन खोकडे, धन्यकुमार पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.
फोटो : २५ भिलवडी १
ओळ : वसगडे (ता. पलूस) येथे वॉटर एटीएमचे उद्घाटन सुरेंद्र वाळवेकर, श्रेणिक पाटील, संपतराव पवार यांच्याहस्ते झाले.