शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आबांच्या सैन्याकडून काका गटाला धोबीपछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 00:08 IST

बाजार समिती निवडणूक : नाराजांच्या खांद्यावरून साधलेला भाजपचा निशाणा चुकला; काँग्रेसही चितपट

दत्ता पाटील- तासगाव --आर. आर. आबांच्या अनुपस्थितीत तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात बाहुबल अजमावताना राष्ट्रवादीने भाजपच्याविरोधात आपली ताकद पणाला लावली होती. नाराजांच्या खांद्यावरून खासदार संजय पाटील यांच्या गटाने धरलेला निशाणा चुकला आणि आबांच्या सैन्याने काका गटाला धोबीपछाड देत बघता-बघता मैदान मारले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चमत्कार घडविणाऱ्या काँग्रेसलाही त्यांनी चितपट केल्याने आबांच्या गटाने तालुक्यातील आपल्या ताकदीची प्रचिती या निवडणुकीतून दिली. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चोवीस वर्षांपासून बिनविरोधचा पायंडा होता. बाजार समितीसाठी मतदान असते, ही बाबच मतदार असणाऱ्या सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना माहीत नव्हती. या निवडणुकीने मात्र मतदारांना हक्क बजावण्याची संधी मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आघाडीचा फॉर्म्युला राबविण्यात आला. तेव्हापासूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या तासगाव बाजार समितीच्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांत याबाबत मतभिन्नता होतीच. किंंबहुना तालुक्याचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असल्यामुळे वर्चस्वासाठी जागावाटपात ओढाताणही सुरू होती. अगदी अखेरच्याक्षणी दोन्ही पक्षांकडून स्वबळ अजमावण्याचा निर्णय झाला.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तासगाव तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळाच फॉर्म्युला राबवला. राष्ट्रवादीच्या नाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सोसायटी गटात राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का दिला. तालुक्यात सोसायट्या आणि ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदीचा फायदा घेऊन सत्तेत येण्याचा आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांना होता. या जोरावरच भाजपने स्वबळ अजमावले. मात्र भाजपची व्यूहरचना फोल ठरली. तालुक्यात खासदार गट पूर्वीसारखाच अभेद्य आहे. मात्र राज्यात, केंद्रात सत्तेत असूनदेखील खासदार पाटील यांना राष्ट्रवादीतील नाराज मतदारांना भाजपकडे खेचून घेण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे. या विजयाने पक्षातील कार्यकर्त्यांत आलेली मरगळ जाऊन आत्मविश्वास दुणावला असल्याचे दिसून येत आहे. तसेच तिसरे स्वतंत्र पॅनेल उभे करून पक्षाची ताकद अजमावणाऱ्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनाही साफ अपयश आल्याचे दिसून आले. त्यांच्या पदरी एकही जागा आली नसल्याने त्यांना सर्वात मोठा हादरा बसला आहे. जिल्हा बँकेच्या फॉर्म्युल्याने कार्यकर्त्यांची एकजूट जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गाफील राहिल्यामुळेच राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता. यापेक्षा भाजपच्या खेळीचे शल्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बोचत होते. दोन्ही पक्षांची आघाडी असताना भाजपकडून राष्ट्रवादीतील नाराजांना हाताशी धरून कुरघोडीचे राजकारण झाले होते. या फॉर्म्युल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहाणपण घेतले. कार्यकर्त्यांनीच निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेतल्यामुळे गटबाजीला थारा मिळाला नाही. ही खेळी भाजपच्या अंगलट आली.अविनाश पाटील यांची निर्णायक भूमिका या निवडणुकीत दिनकरआबा घराण्यातीलच भाजपचे नेते खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अविनाश पाटील आमने-सामने आले होते. भाजपशी आघाडी करण्यासाठी प्रामुख्याने अविनाश पाटील यांचाच ठाम विरोध होता. खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीवर केलेले शाब्दीक हल्ले अविनाश पाटील यांनीच परतवून लावले होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत आलेले सूतगिरणीचे संचालक युवराज पाटील आणि उमेदवार विठ्ठल काशीद यांचाही फायदा राष्ट्रवादीला झाला.स्वाभिमान डिवचल्याने अस्तित्वाची लढाई...बाजार समितीच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. आर. आर. पाटील यांच्या पश्चात राष्ट्रवादीचे भवितव्य काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत होता. कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचलेले होते. अशा परिस्थितीत पक्षाची कोंडी झाली होती. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान डिवचला गेला. त्यामुळे अस्तित्वाची लढाई समजून कार्यकर्त्यांनीच व्यूहरचना करून बाजी मारली. बिनविरोध संचालकांच्यागैरहजेरीची चर्चा प्रक्रिया गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पितांबर पाटील बिनविरोध निवडून आले. त्यांच्या उमेदवारीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकर पाटील यांनी जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सर्व विजयी उमेदवार उपस्थित असताना, पितांबर पाटील यांची गैरहजेरी मात्र प्रकर्षाने जाणवत होती. त्यांच्यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील आणि सूतगिरणीचे माजी संचालक दिलीपराव पवार हेही उपस्थित नव्हते. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू होती.