शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

वसीम रिजवी यांचा सांगलीत निषेध, बडतर्फ करण्याची शिया समाजाची मागणी : मदरशांबाबतचे वक्तव्य संतापजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:00 AM

मदरशांबाबत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केलेले वक्तव्य संतापजनक असून त्यांची या बोर्डावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी मुस्लिम शिया इस्ना अशरी समाजातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.

ठळक मुद्देबडतर्फ करण्याची शिया समाजाची मागणी मदरशांबाबतचे वक्तव्य संतापजनकदेशभरातून निषेध

सांगली : मदरशांबाबत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केलेले वक्तव्य संतापजनक असून त्यांची या बोर्डावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी मुस्लिम शिया इस्ना अशरी समाजातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.यावेळी मौलाना सय्यद बिझाहत हुसैन, मौलाना कोमेल, मौलाना सय्यद रोशन, महंमदअली कलवाणी यांच्यासह जमियत उलमा ए हिंद, समस्त मुस्लिम समाज समाज, मुस्लिम अधिकार आंदोलन, मुस्लिम ब्रिगेड, मिरज शहर सुधार समिती आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मौलाना हुसैन व कोमेल म्हणाले की, राजा राम मोहन रॉय, अब्दुल कलाम आजादसारखे महापुरुष याच मदरशांनी घडविले आहेत. देशभरात अनेक आयएएस अधिकारी, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींनासुद्धा मदरशांनी घडविले आहे. इस्लाम धर्मातील शिक्षणाचा हा मुख्य प्रवाह पूर्वीपासून मानला जात आहे.

शिक्षणाचे पवित्र काम करणाऱ्या मदरशांनी दहशतवाद्यांना जन्म दिल्याचे वादग्रस्त विधान रिजवी यांनी करून मदरसा व इस्लाम धर्माचाही अपमान केला आहे. रिजवी यांना मूळातच मदरशांबद्दल अभ्यास नाही. बेजबाबदारपणे ते काहीही बोलत असतात.यापूर्वीही अनेकदा रिजवी यांनी अशाप्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा उद्योग ते करीत आहेत.

रिजवी हे शिया समुदायाकडून वक्फ बोर्डावर नियुक्त झाले नाहीत, तर वक्फ बोर्ड, महामंडळ वैगेरे पदांवर ज्या त्या वेळेच्या सरकारकडून नियुक्ती केली जाते. सरकारमार्फत नियुक्तीमुळे असे बरेचसे लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी, राजकीय हेतूने वादग्रस्त वक्तव्य करीत असतात.

शिया समुदायाचा रिजवी यांना व त्यांच्या वक्तव्याला कोणताही पाठींबा नाही. याउलट आम्ही या वक्तव्याचा आणि रिजवी यांचा निषेध करीत आहोत. त्यांना शासनाने तात्काळ या पदावरून हटवावे, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांच्यासोबत जमियत उलमा-ए-हिंद संघटनेचे हाफिज मोहम्मदअली मुल्ला, हाफिज आसिफ कुडचीकर, उमर करीम, मुस्मिल समाज संघटनेच्यावतीने उमर गवंडी, आयुब पटेल, मुस्लिम अधिकार आंदोलनाचे मुनीर मुल्ला, साजीद मुजावर, मुस्मिल ब्रिगेडचे आशरफ वांकर, इम्रान पठाण, सुधार समितीचे मुस्तफा बुजरुक, जावेद पटेल उपस्थित होते.

देशभरातून निषेधरिजवी यांच्या वक्तव्याचा देशभर निषेध व्यक्त होत आहे. सांगलीतही आम्ही या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहोत. रिजवी यांनी माफी मागावी, अशी मागणीही उपस्थित धर्मगुरुंनी

टॅग्स :Muslimमुस्लीमSangliसांगली