शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
6
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
7
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
8
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
9
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
10
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
11
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
12
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
13
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
14
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
15
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
16
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
18
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
19
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
20
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच

साताऱ्याजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, सांगलीतील एकजण ठार; आठवड्यातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 13:10 IST

दोनच दिवसांपूर्वी वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात होऊ एक वारकरी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला आहे.

सातारा: दोनच दिवसांपूर्वी वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात होऊ एक वारकरी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून, तीन वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रायगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत आज, मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.भीमराव कोंडिबा पवार (वय ८०, रा.वडीये रायबाग, ता. कडेगाव जि.सांगली)असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध वारकऱ्याचे नाव आहे. अपघातातील मृत व जखमी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील रहिवाशी आहेत. या घटनेनंतर कडेगाव परिसरात शोककळा पसरली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अनेक गावातील वारकरी आळंदी येथे ज्ञानेश्वर माउलीच्या पालखी  सोहळयासाठी ट्रकने निघाले होते. यावेळी पहाटेच्या सुमारास महामार्गावरील गौरीशंकर कॉलेज ते रायगाव फाटा दरम्यान वारकऱ्यांच्या ट्रकचा अचानक टायर फुटला. याचवेळी पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने (एमएच ४६ बीबी २२४१) वारकऱ्यांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकच्या पाठीमागे बसलेले भीमराव पवार हे जागीच ठार झाले. तर अशोक मोहिते (वय ५५), नंदकुमार महाराज पवार (७०), माउली माने (९०, सर्व रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली) हे वारकरी जखमी झाले  आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघाताची माहिती मिळताच वाईच्या पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, महामार्ग पोलीस, भुईज पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातSatara areaसातारा परिसर