तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत तासगावमध्ये रविवारी पदयात्रा

By Admin | Updated: August 14, 2015 00:05 IST2015-08-13T23:30:00+5:302015-08-14T00:05:59+5:30

सुमनताई पाटील : सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची उपस्थिती

Walking through the Tobacco Free Maharashtra campaign in Tasgaon on Sunday | तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत तासगावमध्ये रविवारी पदयात्रा

तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत तासगावमध्ये रविवारी पदयात्रा

तासगाव : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त तासगावात १६ आॅगस्ट रोजी ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सुमनताई पाटील यांनी दिली. या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार बैठकीत दिली.
आबांच्या जयंतीनिमित्त सलाम मुंबई फाउंडेशन, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी, इस्लामपूर आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूविरोधी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत तासगाव शहरासह मणेराजुरी, निमणी, कवठेएकंद, चिंचणीतील माध्यमिक शाळांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
येथील विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये सकाळी साडेआठ वाजता आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पदयात्रेस सुरुवात करण्यात येणार आहे. सोमवार पेठ, बसस्थानक चौक, सिध्देश्वर चौक, ढवळवेसपासून पुन्हा विद्यानिकेतन विद्यालयात याची सांगता होणार आहे. (वार्ताहर)

आबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम : स्मिता पाटील
आर. आर. आबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्मिता पाटील यांनी दिली. १६ अॉगस्टला प्रत्येक गावात आबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. १० ते ४ या वेळेत भगीरथी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कवठेमहांकाळ येथेही याच वेळेत महांकाली हायस्कूलवर रोगनिदान शिबिराचे आयोजन केले आहे. १७ आॅगस्टला तासगावात कोल्हापूर येथील कॅन्सर रोग निदान सेंटरतर्फे रोगनिदान शिबिर, सावळजला रक्तदान शिबिर आणि सायंकाळी सिंधुताई सपकाळ यांचे व्याख्यान होणार आहे.

Web Title: Walking through the Tobacco Free Maharashtra campaign in Tasgaon on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.