शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

सांगलीत वाहन परवान्यांसाठी ‘वेटिंग’११ हजारांवर, कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 13:16 IST

दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहनच्या (आरटीओ) सांगली व सावळी कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत.

ठळक मुद्देवाहन परवान्यांसाठी वेटिंग ११ हजारांवरकार्यालयात वाहनधारकांच्या रांगा

सचिन लाड

सांगली : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहनच्या (आरटीओ) सांगली व सावळी कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत.लायसन्सची प्रक्रिया आॅनलाईन सुरू झाल्याने सध्या कच्चे व पक्के लायसन्स काढण्यासाठी ११ हजार वाहनधारक वेटिंगवर आहेत. मुलाखतीची वेळ घेण्यासाठी आॅनलाईन बुकिंगही फुल्ल आहे. दररोज केवळ १८० वाहनधारकांची परीक्षा घेतली जात असल्याने लायसन्स वेटिंगचा हा आकडा वाढतच आहे.पूर्वी लायसन्स काढण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण केली जायची. आरटीओंचा एक निरीक्षक दिवसाला कच्चे व पक्के सहाशे ते सातशे लायसन्स देण्याचे काम करीत होता; पण कालांतराने यामध्ये बदल झाला. लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, परीक्षेमध्ये असणाऱ्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी लायसन्स कच्चे असो अथवा पक्के, ते काढण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे.नोंदणी केल्यानंतर मुलाखतीची वेळ दिली जाते. ही माहिती संबंधित वाहनधारकाच्या मोबाईलवर मिळते. यामध्ये मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाणाची माहिती दिली जाते. त्यानुसार वाहनधारक कागदपत्रे घेऊन जातात.कच्चे लायसन्ससाठी संगणकावर २० मिनिटांची परीक्षा घेतली जाते.

यामध्ये वाहतूक नियमांचे प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत नापास झाले, तर पुन्हा आॅनलाईन नोंदणी करून मुलाखतीची वेळ घ्यावी लागते. कच्चे लायसन्ससाठी दररोज दोनशे वाहनधारकांना बोलाविले जात आहे.कच्चे लायसन्स मिळाल्यानंतर एक महिन्यानंतर पक्के लायसन्स काढण्यासाठी पुन्हा आॅनलाईन नोंदणी करून मुलाखतीची वेळ घ्यावी लागते. सध्या पक्के लायसन्ससाठी सर्वाधिक वाहनधारक वेटिंगवर आहेत. पक्के लायसन्सची प्रक्रिया सावळीत पार पडली.वास्तविक नोंदणी केल्यानंतर तीन-चार दिवसांत लायसन्स मिळाले पाहिजे; पण वाहनांची वाढती संख्या, लायसन्स काढण्यास होणारी गर्दी व परिवहन आयुक्तांच्या नव्या आदेशामुळे वाहनधारकांना लायसन्स मिळण्यास विलंब लागत आहे.पक्का परवाना : एप्रिलपर्यंत नोंदणीकच्चे व पक्केलायसन्ससाठी प्रत्येकी शंभर वाहनधारकांची आॅनलाईन नोंदणी होत आहे. १९ मार्चपर्यंत सात हजार वाहनधारक वेटिंगवर आहेत. तर पक्क्या लायसन्ससाठी १९ एप्रिलपर्यंत नोंदणी फुल्ल झाल्याने सात हजार वाहनधारक वेटिंगवर आहेत. जरी आता कोणी नोंदणी केली तर त्याला मे, जून महिन्यांत लायसन्ससाठी मुलाखतीची वेळ दिली जात आहे.शिबिरांचे आयोजनसावळीत एका आरटीओ निरीक्षकाने दररोज ६० वाहनधारकांची परीक्षा घेण्याचा आदेश परिवहन आयुक्तांना दिला आहे. त्यानुसार दररोज १२० वाहनधारकांना मुलाखतीची वेळ देऊन बोलाविले जात आहे. दोन निरीक्षक ही प्रक्रिया पार पडतात. अनेकदा एकच निरीक्षक असतात. त्यामुळे त्यादिवशी केवळ ६० वाहनधारकांची परीक्षा घेतली जाते. दररोज प्रत्येक तालुक्यात शिबिर भरवून शंभर ते सव्वाशे वाहनधारकांची परीक्षा घेऊन लायसन्स दिले जात आहे.

टॅग्स :SangliसांगलीRto officeआरटीओ ऑफीस