शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशमधील ईव्हीएम मशीनवर सांगलीत आठ ठिकाणचे मतदान; कंट्रोल, बॅलेट युनिट प्रशासनाच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:47 IST

Local Body Election: तपासणी केल्यावर मतदान यंत्र प्रशासनाने सर्व आठ पालिकांच्या ठिकाणी पाठवली

सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायत निवडणुका २ डिसेंबरला होणार आहेत. त्यासाठी निवडणूक शाखेने मतदान यंत्र आणि मतदान केंद्र निश्चित केली आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी जिल्हा शाखेकडून मध्य प्रदेशातून ४७० कंट्रोल युनिट आणि ९६५ बॅलेट युनिट मशीन प्राप्त झाली आहेत. तपासणी केल्यावर मतदान यंत्र प्रशासनाने सर्व आठ पालिकांच्या ठिकाणी पाठवली आहेत.जिल्ह्यातील उरुण - ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतींच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. नेत्यांकडून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दुसरीकडे, जिल्हा निवडणूक शाखेने मतदान केंद्रे आणि ईव्हीएम मशीनची संख्या निश्चित केली आहे. सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४७० कंट्रोल युनिट आणि ९६५ बॅलेट युनिट तपासणी करून सज्ज ठेवले आहेत.प्रत्येक ईव्हीएम मशीन तपासणी केल्यावर प्रत्येक नगरपालिका मुख्यालयात पाठवण्यात आले आहेत. हे मशीन मध्य प्रदेशातून मागवण्यात आले आहेत आणि जिल्ह्यातील निवडणुका या मशीनवर होणार आहेत. टेक्निशियन विभागाने सर्व यंत्रांची तपासणी केली आहे तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ईव्हीएम मशीनची संख्या पुढीलप्रमाणेपालिका / कंट्रोल युनिट संख्या / बॅलेट युनिट संख्याउरूण-ईश्वरपूर / ९७ / २००विटा / ७५ / १५०आष्टा / ५३ / १०६तासगाव / ६३ / ११५जत / ५० / ९०पलूस / ४० / १२०शिराळा / ३६ / ७२आटपाडी / ५६ / ११२एकूण / ४७० / ९६५

जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी २९१ मतदान केंद्रे असून, ४७० कंट्रोल युनिट आणि ९६५ बॅलेट युनिट तपासणी करून संबंधीत नगरपालिकांच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवली आहेत. यावर्षी शाईऐवजी मार्कर पेनने मतदारांच्या हातावर खूण करण्यात येणार आहे, त्यासाठी १,००४ पेन खरेदी केले आहेत. - डॉ. पवन म्हेत्रे, प्रभारी सहायक आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Elections: EVMs from Madhya Pradesh Secured for Voting.

Web Summary : Sangli prepares for municipal elections on December 2nd. 470 control units and 965 ballot units from Madhya Pradesh have been received and distributed to eight municipalities after inspection. 291 polling booths are ready. Voters will be marked with marker pens instead of ink.