विधानसभेसाठी मतदार नोंदणी सुरू
By Admin | Updated: September 14, 2014 00:13 IST2014-09-14T00:09:25+5:302014-09-14T00:13:18+5:30
प्रशासनाची माहिती : आॅनलाईन अर्जासाठी कागदपत्रे आवश्यक

विधानसभेसाठी मतदार नोंदणी सुरू
सांगली : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा नवीन नाव नोंदणी कार्यक्रम १ आॅगस्टपासून सुरू असून, ज्या मतदारांनी संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज सादर केलेला आहे, अशा मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.
गलांडे म्हणाले की, सांगली विधानसभा मतदारसंघ कार्यालयाकडून यासाठी एसएमएस पाठविला आहे, अशा मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज मुदतीत सादर करावेत. मतदार नोंदणी नमुना फॉर्मबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे. नमुना नं ६ मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी, नमुना नं ७ नावाची वगळणी किंवा आक्षेप, नमुना नं ८ मतदार यादीतील तपशिलामधील दुरुस्ती, ओळखपत्रासाठी व नमुना नं ८ अ एकाच मतदारसंघात ठिकाण बदलण्यासाठी. हे सर्व संबंधित फॉर्म तहसील कार्यालय, मिरज व जिल्हा पुरवठा कार्यालय, सांगली या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येत आहेत.
मतदारांनी ३१ जुलै २०१४ रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत आपली नावे समाविष्ट झालेली आहेत का याची खात्री करावी. नावे मतदार यादीत शोध घेण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. (प्र्रतिनिधी)