शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विटा नगरपालिकेचा १७१ वर्षांचा रंजक प्रवास, सातारा जिल्हा कलेक्टरच्या हुकमतीने चालत होता कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:52 IST

वामन फाटक यांची नगरपालिकेचे पहिले व्हाइस-प्रेसिडेंट म्हणून निवड झाली. जिल्हा कलेक्टर हे कायम अध्यक्ष राहिले.

दिलीप मोहितेविटा : पूर्वीच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील विटा नगरपालिका ही सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक मानली जाते. या नगरपालिकेची स्थापना दि. ३० मार्च १८५४ रोजी ब्रिटिशकालीन ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात झाली. नगरपालिकेचा कारभार प्रारंभी सातारा जिल्हा कलेक्टरच्या हुकमतीने चालत होता.दरवर्षी तीन स्थानिक पंचांची नेमणूक कलेक्टरांकडून केली जात होती. तालुका मामलेदार हा पंच समितीचा एक भाग होता. पंचांचे कामकाज विनावेतन चालत होते. त्या काळी जकात, छापा आणि तपकीर हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत होते. सन १८८१ मध्ये विट्याची लोकसंख्या ४ हजार ४७७ इतकी होती; तर १८८२-८३ मध्ये पालिकेचे उत्पन्न ९३० रुपये आणि खर्च ४८० रुपये होता. त्या काळात विटा गावाच्या भोवती वीस फूट उंचीचा गावकुस बांधलेला होता; तर शिक्षणासाठी केवळ एकच मराठी शाळा चालू होती. दि. ८ सप्टेंबर १८५३ रोजी विट्याच्या ग्रामस्थांनी इंग्रज कंपनीकडे स्थानिक स्वराज्य व्यवस्थेसाठी लेखी कबुली दिली.दि. ३० मार्च १८५४ रोजी औपचारिकपणे विटा नगरपालिकेची स्थापना झाली. सन १८८३ मध्ये शासनाच्या ठरावानुसार विटा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. सन १८८५ मध्ये नागरिकांना मतदानाचा व प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळाला. त्याच वर्षी वामन फाटक यांची नगरपालिकेचे पहिले व्हाइस-प्रेसिडेंट म्हणून निवड झाली. जिल्हा कलेक्टर हे कायम अध्यक्ष राहिले. ही घटना विटा नगरपालिकेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरली. सन १८८५ मध्ये विटा नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली.सन १८८५ मध्ये स्थापनेनंतर दर तीन वर्षांनी निवडणूक होऊ लागली. मात्र, सर्व कारभार जिल्हा कलेक्टर यांच्या हातात असल्याने तेच कायम अध्यक्ष राहिले; परंतु, दि. २४ जानेवारी १९१७ च्या सरकारी ठराव क्रमांक ४९६ ने सुधारणा करून सदस्य मंडळाला बहुमताने लोकनियुक्त सभासदांतून अध्यक्ष निवडता येऊ लागला. त्या काळात रस्ते बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, धर्मशाळा आणि दिवाबत्ती यांसारख्या सोयी श्रीमंत नागरिकांच्या मदतीने आणि नगरपालिकेच्या निधीतून पुरवल्या जात होत्या. बदलत्या काळानुसार विटा शहराचा विकास झाला असून, आज ते आधुनिक सुविधांनी नटलेले आहे.

सन २०११च्या जनगणेनुसार शहराची लोकसंख्या ४८ हजार २८९सन २०११ च्या जनगणनेनुसार विटा शहराची लोकसंख्या ४८ हजार २८९ इतकी आहे. स्थापनेपासून आजपर्यंत स्थानिक स्वराज्याचा दीप प्रज्वलित ठेवणारी ही नगरपालिका पूर्वीच्या दक्षिण सातारा आणि आत्ताच्या सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील एक अभिमानाचा भाग ठरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vita Municipality: 171 years of history, Collector's rule prevailed.

Web Summary : Vita Municipality, established in 1854, initially functioned under the Satara Collector. Elections started in 1883, granting voting rights in 1885. Roads, water, and healthcare were funded by wealthy citizens and the municipality. The 2011 census recorded a population of 48,289.