शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विश्वजित यांची नवी इनिंग सुरू, कडेगाव-पलूसच्या राजकारणाचा आणखी एक अध्याय; विरोधकांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:35 PM

प्रताप महाडिक।कडेगाव : युवक काँग्रेस च्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या राजकीय कारकीर्दीची इनिंग पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरू होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक बिनविरोध होणार, की येथे कदम-देशमुख यांच्यातील राजकीय सत्तासंघर्ष पुन्हा रंगणार, याबाबत मतदारसंघात चर्चा सुरू आहे.या पोटनिवडणुकीत पतंगराव कदम यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे ...

ठळक मुद्देपोटनिवडणुकीचे वारे :

प्रताप महाडिक।कडेगाव : युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या राजकीय कारकीर्दीची इनिंग पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरू होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक बिनविरोध होणार, की येथे कदम-देशमुख यांच्यातील राजकीय सत्तासंघर्ष पुन्हा रंगणार, याबाबत मतदारसंघात चर्चा सुरू आहे.

या पोटनिवडणुकीत पतंगराव कदम यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोघांपैकी एक कोणीही विश्वजित कदम यांच्याविरोधात मैदानात उतरेल. पण पक्षादेश काय येणार, यावर त्यांच्या उमेदवारीचा निर्णय निश्चित होईल असे समजते. दरम्यान, पोटनिवडणूक न लढविण्याचा भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचा निर्णय झाल्यास, कोणी तरी अपक्ष उमेदवार केवळ प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी मैदानात उतरेल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

पलूस-कडेगाव मतदारसंघात आजवर कडवा राजकीय सत्तासंघर्ष झाला असला तरी, येथील कदम-देशमुख घराण्यातील नेत्यांनी विधायक दृष्टिकोनातून विकास कामांसाठी मात्र समन्वय कायम ठेवला. विधायक कामातून तसेच साखर कारखाने, सूतगिरण्या, रोजगार निर्मितीच्या माध्यमातून दोन्ही बाजूंनी बेरजेचे राजकारण होत गेले. जुना भिलवडी-वांगी आणि सध्याच्या कडेगाव-पलूस मतदारसंघात पतंगराव कदम यांनी एकंदरीत सहा निवडणुका जिंकल्या, तर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत संपतराव देशमुख यांनी, तर त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांना पराभवाचा धक्का दिला होता. आता आगामी पोटनिवडणुकीत चित्र कसे असणार, याबाबत मात्र मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

ज्यांनी या मतदारसंघाचे जवळपास ३० वर्षे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळात २० वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला, अशा पतंगराव कदम यांचा वारसा चालविण्याचे आव्हान घेऊन त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांची वाटचाल सुरू राहणार आहे.पोटनिवडणूक : मे महिन्यात शक्यपलूस-कडेगाव मतदारसंघात सर्वाधिक विकसनशील आणि संवेदनशील राजकारण होते, असे म्हटले जाते. या मतदारसंघातील कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्ष सर्वश्रुत आहे. परंतु ९ मार्च २०१८ रोजी या मतदारसंघाचे आमदार पतंगराव कदम यांचे निधन झाले. कदम यांच्या निधनाने येथे दु:खाचे सावट कायम असतानाच, त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आता मेमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीPatangrao Kadamपतंगराव कदम