शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भांडणास कारणीभूत ठरत असल्याचा राग, विश्रामबागला वृद्धेचा तरुणाकडून खून; हल्लेखोर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 15:37 IST

सांगली : घरामध्ये भांडणे होण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या संशयातून आक्काताई नागाप्पा उमरे (वय ७०, रा. कुंभार मळा, १७ वी ...

सांगली : घरामध्ये भांडणे होण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या संशयातून आक्काताई नागाप्पा उमरे (वय ७०, रा. कुंभार मळा, १७ वी गल्ली) या वृद्धेचा शेजारील रोहित सतीश लठ्ठे (वय ३०, रा. कुंभार मळा सांगली) याने एडक्याने वार करून खून केला. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर उपचार सुरू असताना उमरे यांचा मृत्यू झाला. विश्रामबाग पोलिसांनी हल्लेखोर रोहितला अटक केली आहे. मृत उमरे यांचा मुलगा मल्लिकार्जून उमरे (रा. समतानगर, मिरज) याने फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी मल्लिकार्जून नागाप्पा उमरे हा पिकअप गाडी चालवतो. मिरजेत समतानगर येथे तो कुटुंबासह राहतो. तर आई आक्काताई या सांगलीतील कुंभार मळा परिसरात भाड्याने राहण्यास होत्या. त्यांच्या शेजारी जवळचा नातेवाईक संशयित हल्लेखोर रोहित लठ्ठे राहण्यास आहे. आक्काताई आणि रोहित यांच्यात काही महिन्यांपासून किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होते. आक्काताई यांच्यामुळे कुटुंबात भांडणे होतात, असा त्याला संशय होता.आक्काताईमुळे भांडणे होत असल्यामुळे रोहित याने मल्लिकार्जून यांचा भाचा विजय पाटील यास दोन दिवसांपूर्वी फोन करून ‘तुझ्या आजीला घेऊन जा. ती आमच्या घरामध्ये भांडणे होत आहेत. तू तत्काळ तिला घेऊन जा, नाहीतर तिला जिवंत सोडणार नाही’ असे सांगितले होते.दरम्यान बुधवार दि. १४ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास पुन्हा आक्काताई आणि रोहित यांच्यात वाद झाला. त्यातूनच रोहित याने आक्काताई यांच्यावर एडक्याने वार केले. कपाळावर, तोंडावर आणि हातावर वर्मी घाव बसल्याने रक्तस्त्राव झाला. आक्काताई गंभीर जखमी पडल्या. शेजारील राजू कोळेकर व मंगल सतीश लठ्ठे यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी सव्वाच्या सुमारास आक्काताई यांचा गंभीर रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी दुपारी रोहित लठ्ठे यास ताब्यात घेतले आहे.

हल्लेखोर ताब्यातविश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच निरीक्षक ईश्वर ओमासे आणि पथकाने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. त्यानंतर तपासाच्या सूचना दिल्या. हल्ल्यानंतर संशयित रोहित पळून गेला होता. त्याला ताब्यात घेतले. तेव्हा तो नशेत असल्याचे दिसून आले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस