शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

सांगलीतील नेते महाविकास आघाडीसोबत, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बंडखोरीला साथ

By अशोक डोंबाळे | Updated: April 16, 2024 18:25 IST

सांगली : महाविकास आघाडीकडून काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी मंगळवारी बंड करीत कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय ...

सांगली : महाविकास आघाडीकडून काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी मंगळवारी बंड करीत कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा घेतला. मेळाव्याला महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते उपस्थित नव्हते. मात्र, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्राधान्याने हजेरी होती.वसंतदादा घराण्याच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या रूपाने वसंतदादा घराण्याचे अस्तित्व आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अखेरपर्यंत सांगली लोकसभेची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी, यासाठी जिल्हा काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर-जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील यांनी दिल्लीपर्यंत आपली प्रतिष्ठा पणाला लावली. पण, शेवटी उद्धवसेनेचे पैलवान चंद्रहार पाटील यांनी मैदान मारले. हे कसे घडले आणि यामागे कोण ? यापेक्षा आता लढण्यासाठी सोबत कोण? हे मोठे प्रश्नचिन्ह विशाल यांच्यासमोर उभे आहे.

कॉंग्रेस पदाधिका-यांची भूमिका काय ?विश्वजीत कदम असोत अथवा पृथ्वीराज पाटील, विशाल यांच्यासाठी ही मंडळी आपले पद पणाला लावतील का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. विशाल काँग्रेसतर्फे रणांगणात असते तर, या साऱ्यांची एकसंघ ताकत पाठीशी उभी राहिली असती. परंतु आता विशाल यांना काँग्रेस श्रेष्ठींच्या भूमिकेमुळे अपक्ष लढावे लागणार आहे. अशावेळी पदावरील ही मंडळी उघडपणे विशाल यांच्या पाठीमागे उभी राहतील, ही शक्यता धूसर आहे. म्हणूनच नेते महाआघाडीच्या स्टेजवर, कार्यकर्ते विशाल यांच्या पाठीशी हे चित्र मंगळवारी झालेल्या मेळाव्यातून दिसून आले.

माझे पक्षावर एकतर्फी प्रेममी स्वार्थासाठी लढत नाही, तर २००५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर मला उमेदवारी भेटली नाही, पण मी थांबलो. आजपर्यंत थांबलोय, मी पक्षावर एकतर्फी प्रेम केले की काय, असेही विशाल पाटील या मेळाव्यात म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेस