शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील अपक्षच; काँग्रेसने एबी फॉर्म दिलाच नाही, बंडखोरी करणार?

By हणमंत पाटील | Updated: April 20, 2024 12:36 IST

शेवटच्या मिनिटापर्यंत कार्यकर्ते ताटकळत

हणमंत पाटीलसांगली : ‘माझे एकट्याचे नसून हे काँग्रेसचे बंड आहे,’ असे म्हणत इच्छुक विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज भरले होते. मात्र, अर्ज भरण्याच्या शुक्रवारी म्हणजे शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात एबी फॉर्म मिळण्याची शेवटच्या मिनिटापर्यंत वाट पाहत होते. मात्र, काँग्रेसकडून एबी फाॅर्म न मिळाल्याने विशाल पाटील बंडखोरी कायम ठेवत अपक्ष लढणार का? याविषयी उत्सुकता आहे.महाविकास आघाडीच्या जागावाटपात उद्धवसेनेने सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्याला जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला. सांगली आमचा बालेकिल्ला असल्याने ही जागा काँग्रेसला सोडण्याचा आग्रह प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी धरला आहे.दरम्यान, महाविकास आघाडीकडून मैत्रीपूर्ण लढतीसाठी हिरवा कंदील दाखविला जाईल, या आशेवर विशाल पाटील यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन्ही अर्ज चार दिवसांपूर्वी भरले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी या आशेवर पाणी फिरले.

काँग्रेस नेत्यांची नाराजी कायम..विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फाॅर्म शेवटच्या दिवशीही मिळाला नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांचे समर्थन करणारे काँग्रेसच्या नेतेमंडळींना महाविकास आघाडी धर्म पाळावा लागेल. तरीही चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरताना विश्वजित कदम यांनी अनुपस्थित राहून नाराजी दाखविली.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेस