शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले 

By अशोक डोंबाळे | Updated: April 25, 2024 17:24 IST

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करणार

सांगली : महाविकास आघाडीच्या विरोधात काँग्रेसचे बंडखोरी करणारे विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल करण्यासाठीच सांगलीत आलो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल तयार केला आहे. तो दिल्लीला पाठविणार असून, तेथून जो निर्णय होईल त्यानुसार विशाल पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कारवाई करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसेच देशात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.सांगलीतील गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.पटोले म्हणाले, आम्ही सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या सर्व भावना समजून घेतल्या आहेत. यासंबंधीचा सविस्तर अहवाल दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. या अहवालावर दिल्लीतून जो निर्णय होईल, त्यानुसार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्हीही दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांपर्यंत प्रयत्न केले. पण, देशातून भाजप हटविण्यासाठी सर्व मित्र पक्षांची महाविकास आघाडी केली आहे. त्यानुसार सांगलीची जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला गेली आहे. म्हणून महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचार करतील. काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत; मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश आले आहे.

देश कर्जबाजारी करण्याचे पाप भाजपचेदेशाला कर्जबाजारी करण्याचे पाप भाजपने केले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना त्रास देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत देशात भाजप येता कामा नये यासाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपकडून लोकसभा निवडणुकीत वारंवार ४०० पार जागांची घोषणा होते. या जागा त्यांना केवळ देशाचे संविधान बदलण्यासाठीच गरजेच्या आहेत, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

संविधान वाचवणे काँग्रेसची जबाबदारीचकाँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही हतबल नाही आहोत, देशाचं स्वातंत्र्य आणि देशाच्या संविधान निर्मितीत काँग्रेसचे मोठे योगदान आहे. त्यामुळे ते वाचवणे हीदेखील काँग्रेसचीच जबाबदारी आहे. आम्हाला लोभापेक्षा देश महत्त्वाचा. त्यामुळे काँग्रेसचाच कार्यकर्ता निवडणुकीत पुढे असेल. एकदा जागावाटप झाल्यानंतर हे सगळे विसरावे लागते, असेही नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nana Patoleनाना पटोलेvishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेस