शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवघड भाषेतील समीक्षेने मराठीची हानी:वसंत केशव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:04 IST

सांगली : मराठीत लेखनासाठी अनेक दर्जेदार विषय असताना, मराठीतील लेखक आपल्याच कोशात रमले आहेत. त्यामुळे भाषेचा सर्वांगीण आवाका वाचकांपर्यंत ...

सांगली : मराठीत लेखनासाठी अनेक दर्जेदार विषय असताना, मराठीतील लेखक आपल्याच कोशात रमले आहेत. त्यामुळे भाषेचा सर्वांगीण आवाका वाचकांपर्यंत पोहोचविण्यात अपयश येत आहे. सहज सोप्या भाषेत समीक्षण न करता, रूढ भाषा अवघड करत मराठीचे सर्वाधिक नुकसान हे समीक्षकांनीच केले असल्याची टीका ज्येष्ठ समीक्षक वसंत केशव पाटील यांनी रविवारी सांगलीत केले.शब्दसाहित्य विचार मंचच्यावतीने ‘लेखक समजून घेताना’ उपक्रमांतर्गत कवयित्री लता ऐवळे-कदम व युवा नाटककार इरफान मुजावर यांनी वसंत केशव पाटील यांची मुलाखत घेत, साहित्यविश्वातील अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला. यावेळी पाटील यांनी परखडपणे मते व्यक्त करत साहित्यिकांच्या मानसिकतेवर प्रहार केला.पाटील म्हणाले की, साहित्यात अनेक प्रवाह असताना, साहित्यिकांनी हे प्रवाहच समजून घेतले नाहीत. किती लिहिले पाहिजे यापेक्षा काय लिहिले पाहिजे, हेच लेखकांना समजले नसल्याने, अनेक चांगले विषयही वाचकांपासून दूरच राहिले. समीक्षणातून वाचकांना अधिक समजणे अपेक्षित असताना, आपल्या मराठी समीक्षकांनी समीक्षणाची भाषा अवघड करून ठेवली व त्याचा फटका मराठी साहित्याला बसला. त्यापेक्षा सहज सोप्या भाषेतून समीक्षण झाले असते, तर ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचले असते. प्रत्येक लेखकाची बांधिलकी ही शब्दांशी असली पाहिजे.अनुवादनाच्या निमित्ताने देशभर फिरलो. यावेळी अनेकविध अनुभव आले. त्यांचा अनुवादनावेळी खूपच फायदा झाला. लेखन ही ताकद समजून मी त्याच्याशी प्रामाणिक राहून लेखन केले. त्यामुळे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाही मोर्चा, आंदोलनात कधी सहभागी झालो नाही. लेखनापेक्षा अनुवादित साहित्य जास्त असण्याचे कारण म्हणजे, वाचन जास्त झाल्याने अनुदानाकडे वळल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शब्दसाहित्य विचार मंचचे अभिजित पाटील, सुधीर कदम, सचिन पाटील, डॉ. दिलीप कुलकर्णी, महादेव माने, नामदेव माळी, संजय पाटील, प्रतिभा जगदाळे, डॉ. दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.आजच्या कवींचे वाचन कमीआजचे कवी विविध माध्यमातून आपल्या कविता सादर करीत असले तरी, काही तरूण कवींचा अपवाद वगळता आजची कविता आशयाच्यादृष्टीने कमकुवत आढळते. नव्या कवींचे वाचन कमी होत असल्याने त्यांच्या कवितेतही ते जाणवत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.