CoronaVirus Lockdown : आदेशाचं उल्लंघन करत मिरजमध्ये सामूहिक नमाज पठण, ३६ जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:03 IST2020-04-03T16:59:07+5:302020-04-03T17:03:35+5:30
देशभरात लॉकडाउन जाहीर झालं असतानाही सामूहिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र आलेल्या ३६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

CoronaVirus Lockdown : आदेशाचं उल्लंघन करत मिरजमध्ये सामूहिक नमाज पठण, ३६ जण ताब्यात
सांगली : देशभरात लॉकडाउन जाहीर झालं असतानाही सामूहिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र आलेल्या ३६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सांगलीमधील मिरजमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हॉट्सअपवरुन मेसेज करत सर्वांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जमण्यास सांगण्यात आलं होतं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिथे पोहोचून छापा टाकला आणि ३६ जणांना ताब्यात घेतलं. सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेतील मच्छी मार्केट येथे असणाऱ्या बरकत मशिदीत सामूहिक नमाज पठण केलं जात होतं. यावेळी पोलिसांनी छापा टाकून ३६ जणांना ताब्यात घेतलं. डीवायसी संदीप सिंह गिल आणि पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी ही कारवाई केली. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून सर्वांना नमाजासाठी बोलावण्यात आलं होतं.
ताब्यात घेतलेल्या सर्व जणांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कायदेशीर कारवाई केली जात आहे. सोबतच या सर्वांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला जात आहे. मौलवींच्या माध्मामातून त्यांना समजावलं जात आहे. माजी नगरसेवक साजीद अली पठाण हे देखील तिथे उपस्थित आहेत.